Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

Osama Shahab : बिहारमध्ये पुन्हा ‘जंगल राज’ची चाहूल! शहाबुद्दीनचा मुलगा ओसामा शहाब ‘राजद’चा उमेदवार

बिहारच्या सियवान जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘जंगल राज’ परतल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. कारण, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी कुख्यात शहाबुद्दीन यांचा मुलगा ओसामा शहाब याला रघुनाथपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

विशेष प्रतिनिधी

पाटणा :Osama Shahab बिहारच्या सियवान जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘जंगल राज’ परतल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. कारण, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी कुख्यात शहाबुद्दीन यांचा मुलगा ओसामा शहाब याला रघुनाथपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.Osama Shahab

या घोषणेमुळे सियवानचा राजकीय पट पुन्हा एकदा हलला असून, शहाबुद्दीन घराण्याचा वारसा पुन्हा राजकारणात झळकतोय. या निर्णयाची सर्वाधिक चर्चेत असलेली बाब म्हणजे विद्यमान राजद आमदार हरीशंकर यादव यांनी स्वतःची जागा रिकामी करून ओसामाच्या समर्थनार्थ माघार घेतली.Osama Shahab

“शहाबुद्दीन कुटुंबाने माझ्या राजकीय प्रवासात मोठी मदत केली, त्यामुळे ही जागा निष्ठेने सोडतो,” असे यादव म्हणाले.Osama Shahab



हरीशंकर यादव यांनी २०१५ आणि २०२० मध्ये राजदच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यांच्या माघारीनंतर सियवानमधील राजदचा अंतर्गत समीकरण बदलले आहे.

दरम्यान, बिहारमधील महागठबंधनात जागावाटपावर अजूनही एकमत नाही. काँग्रेस, राजद, व्हीआयपी आणि सीपीआय-एमएल या पक्षांमध्ये प्रमुख मतदारसंघांवरून मतभेद सुरू आहेत. राजदने स्वतःच्या दावा नसलेल्या जागांवर उमेदवार जाहीर केले असून, त्यात तेजस्वी यादव यांचाही समावेश आहे.

सियवानचे माजी खासदार मो. शहाबुद्दीन हे एकेकाळी ‘रॉबिनहुड प्रतिमेचे’ पण गुन्हेगारी छायेत वावरणारे नेते होते. १९९६ मध्ये ते खासदार झाले, परंतु शिक्षा झाल्यानंतर त्यांनी पत्नी हिना शहाब यांना राजकारणात उतरवले. मात्र, २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत हिनांना पराभवाचा सामना करावा लागला.

२०२४ मध्ये त्यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून लढा दिला, पण त्या जेडीयूच्या विजयलक्ष्मी कुशवाहा यांच्याकडून तब्बल ९३,००० मतांनी पराभूत झाल्या.

राजदने ओसामाला उमेदवारी देताच विरोधकांनी यावर तीव्र टीका सुरू केली आहे. “राजद म्हणजे गुन्हेगारांचा आसरा, बिहारमध्ये पुन्हा जंगल राज आणायचा प्रयत्न सुरू आहे,” अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली.

सियवानमध्ये हा निर्णय राजदसाठी भावनिक आणि रणनीतिक दोन्ही दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.
स्थानिक नागरिक मात्र प्रश्न विचारत आहेत की“राजदचा वारसा की पुन्हा जंगल राज?”

Bihar Senses the Return of ‘Jungle Raj’! Shahabuddin’s Son Osama Shahab Named RJD Candidate

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment