Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी रालोआत जागावाटपावरून संघर्ष तीव्र झाला आहे. “हम” प्रमुख व केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांनी उघडपणे १५ जागांची मागणी केली आहे. पक्षाला इतक्या जागा मिळाल्या नाहीत तर निवडणूक लढवणार नाही. परंतु रालोआत राहतील. पक्षाच्या मान्यतेसाठी १५ जागा आवश्यक असल्याचे मांझी यांनी सांगितले. भाजप त्यांना जास्तीत जास्त १० जागा देण्यास तयार आहे. त्यांनी रामधारी सिंह दिनकर

वृत्तसंस्था

पाटणा : Bihar  बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी रालोआत जागावाटपावरून संघर्ष तीव्र झाला आहे. “हम” प्रमुख व केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांनी उघडपणे १५ जागांची मागणी केली आहे. पक्षाला इतक्या जागा मिळाल्या नाहीत तर निवडणूक लढवणार नाही. परंतु रालोआत राहतील. पक्षाच्या मान्यतेसाठी १५ जागा आवश्यक असल्याचे मांझी यांनी सांगितले. भाजप त्यांना जास्तीत जास्त १० जागा देण्यास तयार आहे. त्यांनी रामधारी सिंह दिनकर यांच्या ‘दे दो केवल 15 ग्राम, रखो अपनी धरती तमाम।’ या शब्दांत भावना व्यक्त केल्या.Bihar

भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल म्हणाले, रालोआमध्ये जागावाटपाबाबत वाद नाही. सर्व घटक पक्षांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय एकमताने घेतला जाईल. दरम्यान, लोजपा (आर) प्रमुख चिराग पासवान यांनीही जागांबाबतची भूमिका कायम ठेवली आहे. त्यांनी म्हटले आहे की रागावणे चुकीचे आहे. परंतु ते पसंतीच्या जागी ठाम आहे. भाजप त्यांना २०+ जागा देऊ इच्छिते तर ते ३५ च्या मागणीवर ठाम आहेत. त्यांनी वडील रामविलास यांच्या ओळी पोस्ट करत योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, हे स्पष्ट केले.Bihar



लोजपा-आर नेते रईस यांच्या गावी छापा, एके-४७ जप्त

माजी एमएलसी उमेदवार व लोजपा (आर) नेते रईस खान यांच्या अटकेनंतर सतरा दिवसांनी एसटीएफने त्यांच्या गावी एके-४७ यासह शस्त्रे जप्त केली. बुधवारी पहाटे सिसवान पोलिस स्टेशन परिसरातील ग्यासपूर गावात छाप्यात एके-४७, दोन बंदुका, एक पिस्तूल, एक कार्बाइन, दोन लोडेड मॅगझिन आणि डझनभर काडतुसे जप्त करण्यात आली.

Bihar NDA Seat Sharing Feud Intensifies: Manjhi Demands 15 Seats or Boycott, Chirag Paswan Remains Adamant on Preferred Seats

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment