Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

महायुती सरकारवर सतत टीका करणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांचा सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे सन्मान; साहित्य भूषण पुरस्कार प्रदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'चौथे विश्व मराठी संमेलन 2026' च्या उदघाटन प्रसंगी मराठी भाषा विभागामार्फत आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण केले.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे ‘चौथे विश्व मराठी संमेलन 2026’ च्या उदघाटन प्रसंगी मराठी भाषा विभागामार्फत आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण केले. यामध्ये महायुती सरकारवर सतत टीका करणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांचा साहित्य भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नेमाडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री उदय सामंत, छगन भुजबळ, आमदार देवयानी फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषा विभागातर्फे देण्यात आलेले पुरस्कार :

✅ डॉ. भालचंद्र नेमाडे – साहित्यभूषण पुरस्कार

✅ श्रीनिवास कुलकर्णी – विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार (व्यक्ती)

✅ शांतिब्रह्म, गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर – विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार (संस्था)

राज्य मराठी विकास संस्थेतर्फे देण्यात आलेले पुरस्कार :

✅ डॉ. दिलीप धोंडगे – अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (व्यक्ती)

✅ आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी – अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्था)

✅ विनोद कुलकर्णी – मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (व्यक्ती)

✅ कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, कलबुर्गी – मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्था)

✅ निर्मल प्रकाशन, नांदेड – श्री. पु. भागवत पुरस्कार (संस्था)

Bhalchandra Nemade, who has been constantly criticizing the Mahayuti government, has been honored by the government’s Marathi Language Department.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment