Trending News

No trending news found.

Saturday, 10 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
माहिती जगाची

Bangladesh : बांगलादेशात 15 दिवसांत चौथ्या हिंदूचा मृत्यू; धारदार शस्त्रांनी हल्ला केल्यानंतर आग लावण्यात आली होती

बांगलादेशात हिंसाचारात चौथ्या हिंदूचा मृत्यू झाला. 50 वर्षीय व्यावसायिक खोकन चंद्र दास यांच्यावर 31 डिसेंबर रोजी धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वृत्तसंस्था

ढाका : Bangladesh बांगलादेशात हिंसाचारात चौथ्या हिंदूचा मृत्यू झाला. 50 वर्षीय व्यावसायिक खोकन चंद्र दास यांच्यावर 31 डिसेंबर रोजी धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.Bangladesh

खोकन यांच्यावर तेव्हा हल्ला करण्यात आला, जेव्हा ते शरियतपूर जिल्ह्यातील दामुद्या परिसरात केउरभांगा बाजाराजवळ आपले दुकान बंद करून घरी परतत होते.Bangladesh

मीडिया रिपोर्टनुसार, हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली, धारदार शस्त्राने हल्ला केला आणि नंतर पेट्रोल टाकून आग लावली होती. जीव वाचवण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात उडी मारली, त्यानंतर स्थानिक लोकांनी आरडाओरडा केला. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले होते.Bangladesh



स्थानिक लोकांनी त्यांना शरियतपूर सदर रुग्णालयात पोहोचवले, जिथून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने ढाकाला रेफर करण्यात आले. ढाकामध्ये 3 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु शरीर जास्त भाजल्यामुळे त्यांना वाचवता आले नाही.

बांगलादेशात 15 दिवसांच्या आत 4 हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. 18 डिसेंबर रोजी दीपू चंद्र दास यांच्या हत्येनंतर 24 डिसेंबर रोजी जमावाने 29 वर्षीय अमृत मंडल उर्फ सम्राट यांची मारहाण करून हत्या केली होती.

त्यानंतर 29 डिसेंबर रोजी मैमनसिंह जिल्ह्यात 42 वर्षीय कापड कारखान्यातील कर्मचारी बजेंद्र बिस्वास यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Bangladesh Hindu Businessman Khokon Das Dies After Petrol Attack PHOTOS VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment