Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

सगळ्यांचेच संख्याबळ तोकडे, म्हणूनच कुठे, काय मिळते का बघायला मातोश्रीवर भेटले!!

सगळ्यांचेच संख्याबळ तोकडे, म्हणूनच कुठे काय मिळते का बघायला मातोश्रीवर भेटले!!, अशी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची अवस्था आली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि आमदार अमिन पटेल हे आज उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले होते. तिथे त्यांनी राज्याच्या राजकारणा संदर्भात विविध अंगांनी चर्चा केली. या चर्चेची माहिती बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली. या भेटीचे फोटो सगळ्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वर शेअर केले.

नाशिक : सगळ्यांचेच संख्याबळ तोकडे, म्हणूनच कुठे काय मिळते का बघायला मातोश्रीवर भेटले!!, अशी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची अवस्था आली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि आमदार अमिन पटेल हे आज उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले होते. तिथे त्यांनी राज्याच्या राजकारणा संदर्भात विविध अंगांनी चर्चा केली. या चर्चेची माहिती बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली. या भेटीचे फोटो सगळ्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वर शेअर केले.Balasaheb Thorat says we met Uddhav Thackeray. We discussed various issues

महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेतेपदांच्या खुर्च्या खाली आहेत. त्या भरायच्या असल्यास तेवढे संख्याबळ विरोधकांकडे नाही. पण तरी देखील फडणवीस सरकारने “राजकीय कृपा” केली, तर विरोधकांपैकी एखाद्या नेत्याला विधानसभेतले विरोधी पक्षनेते पद मिळू शकते. त्याचबरोबर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते पदही मिळू शकते. ही दोन्ही पदे मिळवण्यासाठी सध्या तोकड्या संख्याबळाच्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा आहे. ही स्पर्धा थोडी शिथिल व्हावी. त्यामध्ये काही तडजोड व्हावी, यासाठी दोन्ही पक्षांमध्ये नेत्यांची धडपड सुरू आहे. या धडपडीचा एक भाग म्हणूनच विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि अमीन पटेल हे उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले होते. उद्धव ठाकरे हे राज्यातल्या कुठल्या काँग्रेस नेत्याकडे भेटायला जाणार नाहीत. ते भेटले तर काँग्रेसच्या फक्त अध्यक्षांना किंवा सोनिया आणि राहुल गांधींनाच भेटायला जातील हे माहिती असल्याने काँग्रेसचे राज्यातले नेते उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन भेटले.



– भास्कर जाधव यांची तडफड

विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आधीच दावा ठोकून ठेवला आहे. त्यासाठी त्यांनी बरीच आदळापट देखील केली आहे. पण महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातले त्यांचे राजकीय कर्तृत्व भाजपला बाधक ठरल्याने भाजपने भास्कर जाधव यांचे विरोधी पक्षनेतेपद अडकवून ठेवले आहे. त्यामुळे भास्कर जाधव कुठल्याही पदाविना तळमळत आहेत. ते कधीही कुठल्यातरी पदासाठी टुणकन उडी मारून महायुतीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

– सतेज पाटलांसाठी लॉबिंग

या पार्श्वभूमीवर विधानसभेतले विरोधी पक्षनेते पदाचे राहू द्यात निदान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद द्या अशी मागणी करायला काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंकडे गेले होते. अंबादास दानवे हे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदावर होते, पण ते निवृत्त झाल्यानंतर ते पद रिकामे झाले. आता त्या पदावर काँग्रेसकडून सतेज पाटलांची वर्णी लावण्यासाठी उद्धव ठाकरेंची परवानगी असावी यासाठी काँग्रेसचे नेते मातोश्रीवर हजेरी लावायला गेले.

– तोंडी लावण्यापुरती चर्चा

बाकी राज्यातल्या राजकारणाची चर्चा, आगामी महापालिका + जिल्हा परिषदा निवडणुका त्यामध्ये महाविकास आघाडी करायची की नाही, वगैरे चर्चा फक्त तोंडी लावण्यापुरत्या ठरल्या. कारण याचे निर्णय मातोश्रीतून उद्धव ठाकरे एका बाजूने घेणार असले, तरी दुसऱ्या बाजूने काँग्रेसचा निर्णय दिल्लीतून होणार आहे. शिवाय महाविकास आघाडीतले तिसरे शरद पवारांचे नेते मातोश्री वरच्या बैठकीला हजरही नव्हते. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडी हा विषय तोंडी लावण्यापुरता चर्चेचा ठरला. महत्त्वाची चर्चा फक्त विरोधी पक्षनेते पदावर झाली. मात्र उद्धव ठाकरेंनी याबाबत शब्द दिला की नाही, याची कुठलीही माहिती समोर आली नाही.

Balasaheb Thorat says we met Uddhav Thackeray. We discussed various issues

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment