Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणाले- आम्ही ECला भेटलो, पण समाधान झाले नाही, चुकीच्या मतदारयाद्या लोकशाहीसाठी घातक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत आपले कोणतेही समाधान झाले नसल्याचे मत व्यक्त केले आहे. आम्ही राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. पण त्याने आमचे कोणतेही समाधान झाले नाही. आगामी निवडणुका चुकीच्या मतदार याद्यांसह निवडणूक होणार असतील, तर ते निकोप लोकशाहीसाठी घातक आहे, असे ते म्हणालेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Balasaheb Thorat  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत आपले कोणतेही समाधान झाले नसल्याचे मत व्यक्त केले आहे. आम्ही राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. पण त्याने आमचे कोणतेही समाधान झाले नाही. आगामी निवडणुका चुकीच्या मतदार याद्यांसह निवडणूक होणार असतील, तर ते निकोप लोकशाहीसाठी घातक आहे, असे ते म्हणालेत.Balasaheb Thorat

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यात त्यांनी मतदारयाद्यांतील चुकांवर बोट ठेवत आयोगावर धारदार प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर आयोजित एका संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीतून आपले कोणतेही समाधान झाले नसल्याचे स्पष्ट केले.Balasaheb Thorat



घोटाळ्यांनी भरलेल्या मतदार याद्यांवर विधानसभेची निवडणूक झाली

थोरात म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण आमचे समाधान झाले नाही. आयोगाने आमच्या प्रश्नांची कोणतीही स्पष्ट उत्तरे आम्हाला दिले नाही. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मतदार यादीतील चुकांकडे आयोगाचे लक्ष वेधले. पण आयोगाने आम्हाला कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे ती निवडणूक चुकांसह झाली. काही आमदार सांगतात की, आम्ही बाहेरून 20 हजार मते आणली. काहींची नावे वगळली गेली, तर काहींची तीच तीच नावे दिसून येत आहेत. वसतिगृहात राहणारे परराज्यातील विद्यार्थीही महाराष्ट्राचे मतदार म्हणून दाखवले जात आहेत. अशा अनेक घोटाळ्यांनी भरलेल्या मतदार यादीवर राज्याची विधानसभा निवडणूक झाली.

निकोप निवडणूक हाच लोकशाहीचा पाया

ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणूक होऊन आता बराच कालावधी झाला आहे. पण त्यानंतरही मतदार याद्यांचे पुनर्विलोकन करण्यात आले नाही. त्यात दुरुस्ती करण्यात आली नाही. ही केंद्राची जबाबदारी होती. पण त्यांनी ते केले नाही. राज्य निवडणूक आयोग या प्रकरणी आमचा संबंध नसल्याचा दावा करते. त्यामुळे याच चुकीच्या याद्यांवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असतील तर ते पूर्णतः अयोग्य आहे. हे निकोप लोकशाहीसाठी घातक आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा देशपातळीवर मांडला आहे.

निकोप निवडणूक हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. हा पायाच उद्ध्वस्त करण्याचे काम सध्या केले जात आहे. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आमचा आरोप आहे, असेही थोरात यावेळी म्हणाले.

Balasaheb Thorat Expresses Dissatisfaction with Election Commission Meeting; Warns ‘Scam-Ridden’ Voter Lists Threaten Healthy Democracy

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment