Trending News

No trending news found.

Tuesday, 9 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी बाळ मानेंना हरणाऱ्या निवडणुकीत दिली उमेदवारी; पण त्यांनी माघार घेतल्यावर शिवसेनेतून केली वजाबाकी!!

उद्धव ठाकरेंनी बाळ मानेंना हरणाऱ्या निवडणुकीत दिली उमेदवारी ; पण त्यांनी माघार घेतल्यावर शिवसेनेतून केली वजाबाकी !!, हे राजकारण आज घडले.

नाशिक : उद्धव ठाकरेंनी बाळ मानेंना हरणाऱ्या निवडणुकीत दिली उमेदवारी ; पण त्यांनी माघार घेतल्यावर शिवसेनेतून केली वजाबाकी !!, हे राजकारण आज घडले.

उद्धव ठाकरे यांनी बाळ माने यांना रत्नागिरी – सिंधुदुर्ग – रायगड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली. पण मुळातच उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे त्यांना निवडून आणण्यासाठी अपेक्षित असणारी मतांची संख्या नव्हती. तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी बाळ माने यांना भरीस घालून त्यांना अनिकेत तटकरे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी उभे केले. बाळ मानेंनी हिरीरीने निवडणूक लढवावी, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीत बसून काढले. बाळ माने यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांचे आदेश शिरसावंद्य मानून उमेदवारी अर्ज भरला.

– ४० पण सह्या नाहीत

पण हा उमेदवारी अर्ज भरतानाच त्यांना या निवडणुकीतल्या फोलपणाची जाणीव झाली. कारण त्यांना अपेक्षित असणारी सूचकांची 40 जणांची यादी आणि त्यांच्या सह्याच सादर करता आल्या नाहीत. उद्धव ठाकरे गटाकडे 55 नगरसेवक असताना प्रत्यक्षात बाळ माने यांना 40 जणांनी सुद्धा सूचक म्हणून सह्या दिल्या नाहीत. उद्धव ठाकरेंचे आदेश त्यांच्या गटाच्या नगरसेवकांपर्यंत सुद्धा पोहोचू शकले नाहीत.

– मतांची बेगमीच नाही

याच दरम्यान बाळ माने यांनी महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांशी आणि मतदारांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना बहुतेक सगळे जण पर्यटनाला किंवा तीर्थयात्रेला गेल्याचे आढळले. तिथेच बाळ माने यांचा मोठा भ्रमनिरास झाला. उद्धव ठाकरेंनी बाळ माने यांना भरीस घालून निवडणुकीत उभे केले खरे, पण ते बाळ माने यांच्यासाठी आवश्यक तेवढ्या मतांची किंवा सूचकांची बेगमी सुद्धा करू शकले नाहीत.

– बाळ मानेंची हकालपट्टी

त्यामुळे बाळ माने यांनी निवडणुकीतून माघार घेतली. मुळातच बाळ माने ही निवडणूक हरणार होते. त्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांना भरीस घालून उमेदवारी दिली होती. पण बाळ माने यांनी माघार घेतली. त्यांनी माघार घेतल्याबरोबर उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब मातोश्री बसूनच बाळ मानेंच्या शिवसेनेतून हाकालपट्टीचे आदेश काढले. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे ते आदेश सर्वांना जाहीर केले. बाळ माने पक्षविरोधी कारवायांमध्ये सामील झाल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिवसेनेतून केल्याचे संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर नमूद केले.



– कळीचे सवाल

बाळ माने यांनी माघार घ्यावी म्हणून नारायण राणे आणि नितेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे उद्धव ठाकरे चिडले आणि त्यांनी आधीच गळती लागलेल्या आपल्या शिवसेनेतून बाळ माने यांच्यासारख्या कार्यकर्त्याची हकालपट्टी करून वजाबाकी केली. बाळ माने पक्षविरोधी कारवायांमध्ये सामील झाले पण ते का सामील झाले??, उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी देताना मतदारांची आणि सूचकांची अपेक्षित संख्येची बेगमी का केली नाही??, हे कळीचे सवाल मात्र संजय राऊत यांनी सोशल मीडिया अकाउंट वरून केले नाहीत किंवा त्यांनी त्यांची उत्तरेही दिली नाहीत.

निवडणुकीचे वास्तव चित्र

– मतदारांची एकूण संख्या : १०१८

– महाविकास आघाडीचे संख्याबळ : २००

– शिवसेना मशाल चिन्हाचे नगरसेवक : ५५

– बाळ मानेंना मिळालेल्या स्वाक्षऱ्या : ४० पेक्षा कमी

Bal Mane has been expelled from the Shiv Sena (UBT)

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment