Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
ताज्या बातम्या

Atharva Sudame : सुदामेंना वाढता पाठिंबा; समाजमाध्यमांवर अनेकांनी व्यक्त केल्या भावना

  विशेष प्रतिनिधी पुणे:Atharva Sudame controversy: पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया प्रभावक आणि विनोदवीर अथर्व सुदामे याच्या गणेशोत्सवाविषयीच्या रीलमुळे तीव्र वाद निर्माण झाला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या रीलवर हिंदुत्ववादी गट आणि ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला. यानंतर अथर्वने व्हिडीओ काढून टाकत जाहीर माफी मागितली.Atharva Sudame controversy  रीलमधील आशय अथर्वच्या रीलमध्ये तो गणेशमूर्ती खरेदीसाठी एका मूर्तिकाराकडे जातो, जो मुस्लिम आहे. मूर्तिकाराचा मुलगा त्याला “अब्बा” म्हणत जेवणाचा डबा आणतो, ज्यामुळे मूर्तिकाराच्या धार्मिक ओळखीचा खुलासा होतो. मूर्तिकार अथर्वला सांगतो, “जर तुम्हाला इथून मूर्ती नको असेल, तर दुसऱ्या दुकानात जा.” यावर अथर्व म्हणतो, “माझे वडील म्हणतात, आपण साखर व्हावं, जी खीरही बनवते […]

 

विशेष प्रतिनिधी

पुणे:Atharva Sudame controversy: पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया प्रभावक आणि विनोदवीर अथर्व सुदामे याच्या गणेशोत्सवाविषयीच्या रीलमुळे तीव्र वाद निर्माण झाला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या रीलवर हिंदुत्ववादी गट आणि ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला. यानंतर अथर्वने व्हिडीओ काढून टाकत जाहीर माफी मागितली.Atharva Sudame controversy

 रीलमधील आशय

अथर्वच्या रीलमध्ये तो गणेशमूर्ती खरेदीसाठी एका मूर्तिकाराकडे जातो, जो मुस्लिम आहे. मूर्तिकाराचा मुलगा त्याला “अब्बा” म्हणत जेवणाचा डबा आणतो, ज्यामुळे मूर्तिकाराच्या धार्मिक ओळखीचा खुलासा होतो. मूर्तिकार अथर्वला सांगतो, “जर तुम्हाला इथून मूर्ती नको असेल, तर दुसऱ्या दुकानात जा.” यावर अथर्व म्हणतो, “माझे वडील म्हणतात, आपण साखर व्हावं, जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही; आपण वीट व्हावं, जी मंदिरातही बसते आणि मशिदीतही.” या संवादामुळे हिंदुत्ववादी गटांनी आणि ब्राह्मण महासंघाने अथर्ववर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला.

 ब्राह्मण महासंघाची टीका

ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी अथर्ववर कठोर टीका केली. ते म्हणाले, “अथर्वने फक्त मनोरंजनावर लक्ष द्यावे. अभ्यास नसलेल्या विषयांवर बोलू नये. साखरेच्या नावाखाली हिंदूंना गेली शतके विष पाजले गेले आहे. गणपती कोणाकडून घ्यायचा, हा तुझा विषय नाही. तुझ्या मर्यादेत राहा.”

  • सुदामेंना वाढता पाठिंबा; समाजमाध्यमांवर अनेकांनी व्यक्त केल्या भावना

पाठिंबा आणि समर्थन

या प्रकरणात अथर्वला अनेक स्तरांतून पाठिंबा मिळाला. वकील असिम सरोदे यांनी अथर्वला प्रोत्साहन देत म्हटले, “अथर्व, घाबरू नकोस. तुझा व्हिडीओ बंधुभावाचा संदेश देणारा होता. राज ठाकरेंनी तुझे कौतुक केले आहे. तो व्हिडीओ पुन्हा अपलोड कर.” राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनीही एक्सवर पोस्ट करत अथर्वला पाठिंबा दिला, “अथर्वचा व्हिडीओ हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा होता. काही मनुवादी लोकांनी त्याला धमकावले. अशा दुही माजवणाऱ्यांविरुद्ध आपण अथर्वच्या पाठीशी उभे राहायला हवे. अथर्व, पुढे जा, आम्ही तुझ्यासोबत आहोत!” राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते अमोल मिटकरी यांनीही अथर्वला समर्थन दिले. तसेच, आमदार रोहित पवार यांनीही अथर्वच्या रीलला पाठिंबा देत मनुवादी टीकेचा निषेध केला.



अथर्वची माफी

वाद वाढल्यानंतर अथर्वने व्हिडीओ हटवला आणि नव्या व्हिडीओद्वारे माफी मागितली. तो म्हणाला, “माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मी यापूर्वी मराठी सण आणि संस्कृतीवर रील्स बनवल्या आहेत. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”

सोशल मीडियावर दोन गट

या प्रकरणाने सोशल मीडियावर मतभेद निर्माण झाले. काहींनी अथर्वच्या सकारात्मक संदेशाचे कौतुक केले, तर काहींनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप करत टीका केली. एका युजरने लिहिले, “अथर्वने चार तासांतच व्हिडीओ हटवला. हिंदूंच्या भावनांशी खेळाल, तर परिणाम भोगाल.”

अथर्वच्या रीलमुळे गणेशोत्सवापूर्वी सामाजिक सलोख्यावरून वाद निर्माण झाला. छोट्या रीलने मोठा वाद उभा केला, ज्यामुळे सोशल मीडियावरील संवेदनशीलतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. अथर्वने माफी मागितली असली, तरी या प्रकरणावरील चर्चा सुरूच आहे.

 

Atharva Sudame gets support from all levels

 

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment