Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Amravati Case :अमरावती लैंगिक शोषणप्रकरणी कारवाई; 180 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या अयाज तनवीरच्या घरावर बुलडोझर, सरकारकडून SIT दाखल

परतवाडा शहरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण आणि त्यानंतर ब्लॅकमेल केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सुरुवातीला मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे उजेर खान इकबाल खान, तरबेज खान तस्लिम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक या तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

विशेष प्रतिनिधी

अमरावती : Amravati Case परतवाडा शहरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण आणि त्यानंतर ब्लॅकमेल केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सुरुवातीला मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे उजेर खान इकबाल खान, तरबेज खान तस्लिम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक या तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.Amravati Case

या प्रकरणात व्हिडिओ व्हायरल केल्याच्या धक्कादायक प्रकरणात आता प्रशासनानेही कडक पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर याच्या घरावर कारवाई सुरू झाली आहे. अचलपूर नगरपरिषदेकडून संबंधित घरावरील अतिक्रमणाबाबत तपास केला असून, काही भाग बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर नगरपरिषदेने आरोपीच्या कुटुंबाला अतिक्रमणासंदर्भात नोटीस बजावल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार आज बुलडोझरद्वारे कारवाई करण्यात आली. दरम्यान, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या घराजवळ पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये.Amravati Case



दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

या प्रकरणात भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी गंभीर आरोप करत संबंधित आरोपीने 180 तरुणींचे शोषण केले आणि सुमारे 350 अश्लील व्हिडिओ तयार करून व्हायरल केल्याचा दावा केला आहे. या आरोपांनंतर पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला. आरोपींनी प्रेमाच्या बहाण्याने मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे समोर येत असून, हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईलमधून मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ आढळल्याची माहिती मिळत आहे. हे व्हिडिओ इतर साथीदारांना पाठवले गेले का, याचा शोध घेतला जात आहे. काही व्हिडिओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाल्याचेही समोर आले आहे. पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आरोपींनी मोबाईलमधील डेटा डिलीट केला असला, तरी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तो पुन्हा मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. खासदार अनिल बोंडे यांनी आरोपी एमआयएमचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करत ही केवळ एका व्यक्तीची बाब नसून संघटित टोळी काम करत असल्याचा दावा केला आहे. स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअ‍ॅपवर गट तयार करून हे जाळे पसरवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच चिखलदरा परिसरातील हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास या रॅकेटचा मोठा खुलासा होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्य आरोपीला 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरू ठेवला असून, महिला अधिकारी आणि सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने सात पीडित तरुणींची नावे उघड केली आहेत. न्यायालयाने मुख्य आरोपीला 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Amravati Case Update: Main Accused’s House Demolished; SIT Formed

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment