Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

पुणे पिंपरी चिंचवड मध्ये आघाडी करताना अजितदादांचा डाव; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुतारीवरच घातला घाव!!

भाजपची खेळी; पवार काका - पुतण्यांची युती सहज नाही सोपी; पुण्यात दोघांची जागावाटपात खेचाखेची!!, हे राजकीय चित्र पुणे महापालिका निवडणुकीच्या ऐन मध्यावर आज समोर आले

नाशिक : भाजपची खेळी; पवार काका – पुतण्यांची युती सहज नाही सोपी; पुण्यात दोघांची जागावाटपात खेचाखेची!!, हे राजकीय चित्र पुणे महापालिका निवडणुकीच्या ऐन मध्यावर आज समोर आले, पण त्या पलीकडे जाऊन अजितदादांची आणखी एक खेळी समोर आली, ती म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आघाडी करताना अजितदादांनी खेळला डाव; पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुतारीवरच घातला घाव, ही ती खेळी होय!!

2017 च्या निवडणुकीत हीच राष्ट्रवादी एक असताना पवार काका – पुतण्यांच्या दोन पक्षांमध्ये जागावाटपाची खेचाखेची झाली नव्हती. उलट निवडणुकीची सगळी सूत्रे अजित पवारांच्या हातात होती. अजित पवारांनीच सगळ्यांची तिकिटे ठरविली आणि बसविली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सगळ्या यश किंवा अपयशाची जबाबदारी अजित पवारांवरच राहिली.

पण 2025 च्या निवडणुकीत सगळे चित्र पालटले भाजपने अजितदादांना महायुतीतून दूर सारले. त्यांना पुण्यात एकाकी लढायला लावले. अशावेळी अजितदादांना त्यांच्या काकांचा सहारा घेतल्यावाचून पर्यायच उरला नाही. पण तो सहारा घेताना सुद्धा अजितदादांनी स्वतःच्या अटी शर्ती काकांच्या पक्षावर लादल्या. त्यामुळेच पवार काका – पुतण्यांच्या राष्ट्रवादींमध्ये पुण्यातल्या जागावाटपाची खेचाखेची सुरू झाली.

– जागांच्या खेचाखेचीचे प्रस्ताव

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना 65 जागांचा प्रस्ताव दिला तो खुदा अजितदादांनीच सामान्य करून टाकला आमचा पक्ष तुम्हाला 30-35 पेक्षा जास्त जागा देऊ शकत नाही कारण तेवढी तुमची ताकदच नाही, असे अजितदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावल्याची बातमी मराठी माध्यमांनी चालविली. त्यावर आमची सुद्धा ताकद कमी नाही हे पवारांच्या नेत्यांनी अजितदादांना ऐकविल्याचे त्या बातमीत नमूद केले.

– तुतारी चिन्हावरच आघात

त्याचवेळी अजितदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुढे एक नवाच पेच टाकला. आपल्या दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र लढायचे असेल, तर तुम्ही सगळे घड्याळ चिन्ह घेऊनच लढा. त्यामुळे आपल्या दोन्ही पक्षांच्या जागा वाढतील, असा दावा अजितदादांनी केला. हा सरळ सरळ शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर आणि पक्षावर आघात ठरला. कारण त्यामुळे पुणे महापालिकेतले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला. तो धोका बाकी कुठल्या पक्षाने नाही, तर खुद्द अजितदादांनीच निर्माण करून ठेवला.

– भाजपची खेळी

हे सगळे राजकारण भाजपच्या एका खेळीमुळे घडले. भाजपने अजितदादांना महायुतीतून दूरच सारले. त्यांना पुणे महापालिकेत एकाकीपणे लढायला लावले म्हणून अजितदादांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करायची वेळ आली. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुबळी अवस्था बघून अजितदादांनी त्यांच्यावर कुरघोडी केली. त्यांना कमी जागांमध्ये आटोपण्याचा प्रयत्न केलाच, पण त्याचबरोबर तुतारी चिन्ह आणि पवारांच्या राष्ट्रवादीवर सुद्धा आघात करायचा डाव खेळला. आता या राजकारणाचा निष्कर्ष काय निघतो, हे त्या दोन दिवसांत समजू शकेल.

Ajit Pawar’s strategy while forming an alliance in Pune and Pimpri-Chinchwad.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment