Trending News

No trending news found.

Friday, 9 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच अडकल्याची टीका झाल्यानंतर अजितदादांना जाग, महाराष्ट्रात अजून दोन – चार ठिकाणी फिरणार शेवटच्या टप्प्यात!!

पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच अडकल्याची टीका झाल्यानंतर अजितदादांना आली जाग, महाराष्ट्रात अजून दोन-चार ठिकाणी फिरणार शेवटच्या टप्प्यात!!, अशी अवस्था अजित पवारांची झाली आहे.

नाशिक : पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच अडकल्याची टीका झाल्यानंतर अजितदादांना आली जाग, महाराष्ट्रात अजून दोन-चार ठिकाणी फिरणार शेवटच्या टप्प्यात!!, अशी अवस्था अजित पवारांची झाली आहे. Ajit Pawar

महाराष्ट्रातल्या 29 महापालिका निवडणुकांपैकी अजित पवारांनी फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जास्त लक्ष केंद्रित केले. दोनच महापालिकांमध्ये त्यांनी गेल्या दहा – पंधरा दिवसांपासून प्रचाराचा धडाका लावला होता. राज्यात उपमुख्यमंत्री पद भोगून सुद्धा अजितदादा फक्त आपल्या शहरांपुरता मर्यादित प्रचार करत आहेत. किंबहुना त्यांना तसा प्रचार करावा लागतोय, अशी वातावरण निर्मिती महाराष्ट्रात झाली. त्याबद्दल अनेकांनी अजित पवारांना सोशल मीडियावरून टार्गेट देखील केले. अजितदादांना फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांचे पडले आहे. इतर महापालिकांशी त्यांना काही देणे घेणेच नाही, असे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा बोलले जाऊ लागले.

– टीकेनंतर अजित दादांना आली जाग

या टीकेनंतर अजित पवारांना जाग आली आणि त्यांनी महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड सोडून इतर महापालिकांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी सांगली, लातूर, परभणी, अमरावती आदी शहरांची निवड केली. या शहरांमध्ये आमचे इतर सहकारी लक्ष घालतच आहेत पण आता मी सुद्धा दौरा करणार आहे, असे अजित पवारांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

– पण झेप दोन-चार शहरांच्या पलीकडे नाही

महापालिकांच्या निवडणुकांमध्ये प्रचाराला फक्त तीन दिवसांचा अवधी उरला असताना अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड वरून बाहेर पडावे लागले. महाराष्ट्रात इतरही शहरे आहेत आणि तिथे देखील आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळेच त्यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून बाहेर पडावेसे वाटले. पण दिवसच फार कमी उरले असल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड वरून दोन चार शहरांच्या पलीकडे अजित पवारांची झेप जाणार नाही, हे देखील स्पष्ट झाले.

– फडणवीस, शिंदेंचा महाराष्ट्र दौरा पूर्ण

त्या उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचा पहिल्या टप्प्यातला दौरा पूर्ण झाला आणि त्यांनी माध्यमांना द्यायच्या मुलाखती देखील पूर्ण करत आणल्या. त्यांनी पहिल्या टप्प्यात सर्व महापालिका परिक्षेत्रांमध्ये जाहीर सभा घेतल्या. 29 पैकी एकही महापालिका त्यांनी सोडली नाही.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ठाणे, नवी मुंबई पट्ट्यातल्या महापालिकांवर लक्ष केंद्रित केले असले तरी त्यांनी नाशिक आणि विदर्भातले महापालिकांवर पहिल्या टप्प्यातच दौरा उरकून घेतला. त्यापाठोपाठ मराठवाड्यातल्या महापालिकांमध्ये सुद्धा ते पोहोचले.

– सुप्रिया सुळे कुठेच नाहीत

पण याच दरम्यानच्या काळात ठाकरे बंधू फक्त मुंबईत मुलाखती देत बसले. अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच लक्ष केंद्रित केले. सुप्रिया सुळे तर कुठल्या प्रचाराकडे फिरकल्या सुद्धा नाहीत‌. त्याउलट देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. ते सरकारी बंगल्यांमध्ये किंवा खाजगी निवासस्थानांमध्ये बसून राहिले नाहीत.

Ajit Pawar stuck only in Pune and Pimpri Chinchwad

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment