Trending News

No trending news found.

Saturday, 10 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
माहिती जगाची

Air India Pilot : विमान उडवण्यापूर्वी एअर इंडिया वैमानिकाचे मद्यप्राशन; चाचणीत नापास, कॅनडाहून दिल्लीला येणाऱ्या विमानातून उतरवले

कॅनडाच्या व्हँकुव्हरहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील पायलटला विमानातून उतरवण्यात आले. पायलटवर दारू प्यायल्याचा आरोप होता. ही घटना २३ डिसेंबरची आहे, एअर इंडियाचे AI186 हे विमान टेक-ऑ

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Air India Pilot  कॅनडाच्या व्हँकुव्हरहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील पायलटला विमानातून उतरवण्यात आले. पायलटवर दारू प्यायल्याचा आरोप होता. ही घटना २३ डिसेंबरची आहे, एअर इंडियाचे AI186 हे विमान टेक-ऑफ करणार होते. तेव्हा व्हँकुव्हर विमानतळावरील एका कर्मचाऱ्याने पायलटला वाईन पिताना पाहिले.Air India Pilot

त्यानंतर कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. कॅनेडियन अधिकारी पायलटची चौकशी करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्याच्या तोंडा जवळून वास येत होता. त्यानंतर पायलटची ब्रेथ अ‍ॅनालायझर चाचणी घेण्यात आली. ज्यात तो नापास झाला.Air India Pilot



एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, विमान चालवण्यासाठी दुसऱ्या पायलटला रोस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर तो विमान घेऊन दिल्लीला आला. विमानाला सुमारे २ तासांचा विलंब झाला.

पायलटविरोधात चौकशी सुरू, ड्युटीवरून हटवले

एअर इंडियाने गैरसोयीबद्दल माफी मागितली. प्रवक्त्याने सांगितले की, एअर इंडिया आपल्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करते आणि स्थानिक अधिकाऱ्यांसोबत पूर्ण सहकार्य करत आहे.

प्रतीक्षेदरम्यान प्रवाशांना नाश्ता देण्यात आला. एअरलाइनने त्यांना आश्वासन दिले की, या घटनेदरम्यान त्यांची सुरक्षा आणि आराम ही पहिली प्राथमिकता आहे. सध्या वैमानिकाविरोधात चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला ड्युटीवरून हटवण्यात आले आहे.

Air India Pilot Fails Alcohol Test Vancouver Airport PHOTOS VIDEOS CCTV Footage

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment