Trending News

No trending news found.

Monday, 12 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

अहमदाबादच्या साणंद येथील कालाना गावात मंगळवारी सकाळी दोन समुदायांच्या लोकांमध्ये हिंसक झटापट झाली. हा वाद जुन्या वैमनस्यातून झाला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली. या हिंसाचाराचा थेट व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात लोक एकमेकांवर दगडफेक करताना दिसत आहेत. पोलिसांनी 40 जणांना ताब्यात घेतले आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वृत्तसंस्था

अहमदाबाद : Ahmedabad Sanand Violence अहमदाबादच्या साणंद येथील कालाना गावात मंगळवारी सकाळी दोन समुदायांच्या लोकांमध्ये हिंसक झटापट झाली. हा वाद जुन्या वैमनस्यातून झाला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली. या हिंसाचाराचा थेट व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात लोक एकमेकांवर दगडफेक करताना दिसत आहेत. पोलिसांनी 40 जणांना ताब्यात घेतले आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.Ahmedabad Sanand Violence



तरुणाच्या मारहाणीनंतर दगडफेक

मिळालेल्या माहितीनुसार, गावात राहणाऱ्या तरुणांच्या दोन गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर एका पोस्टवरून वाद सुरू आहे. यामुळे सोमवारीही एका गटातील तरुणाला दुसऱ्या गटातील तरुणांनी मारहाण केली होती. यानंतर दोन्ही बाजूंनी डझनभर लोक एकमेकांशी भिडले. बघता बघता दोन्ही बाजूंनी लोकांची संख्या वाढली आणि एकमेकांवर जोरदार दगडफेक सुरू झाली. कशाबशा परिस्थिती नियंत्रणात आणली गेली.

मंगळवारी सकाळी पुन्हा भिडले मंगळवारी सकाळी दोन्ही गटांमध्ये पुन्हा कोणत्यातरी कारणावरून वाद झाला आणि दगडफेक सुरू झाली. पोलिसांची अनेक पथके गावात पोहोचली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात शांतता आहे. पोलीस संशयितांची चौकशी करत आहेत. दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Ahmedabad Sanand Violence: 40 Arrested After Clash Over Social Media Post

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment