विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : सरकार आपल्या दारी ते शिवसेना घेऊन आली योजनांची शिदोरी, इथपर्यंत महायुतीचा राजकीय प्रवास झाल्याचे आज समोर आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरकार आपल्या दारी योजनेची अंमलबजावणी करून महायुती सरकारने मतदारांचा विश्वास जिंकला होता. त्या योजनेचा संपूर्ण महायुतीला राजकीय फायदा देखील झाला होता.The government has brought a wealth of schemes to the Shiv Sena from its doorstep, this is how far the political journey has come!!
पण आज रत्नागिरी येथील ‘तारांगण’ या प्रकल्पातील ‘भारतरत्न शिल्प’ या सात भारतरत्नांच्या अनोख्या शिल्पांचा अनावरण सोहळा संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या लौकिकात ही शिल्पं अधिकच भर घालतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
पण त्याच वेळी एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या विविध शासकीय योजनांचे लाभ थेट लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेना पक्षाने सुरू केलेल्या धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता केंद्राचे देखील उद्घाटन केले. तिथे शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी, असे लिहिले आहे. याचा अर्थ असा की महायुती सरकार आपल्या दारी ते शिवसेना घेऊन आली योजनांची शिदोरी इथपर्यंत राजकीय प्रवास येऊन ठेपला आहे. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे तंत्र शिवसेनेच्या नेत्यांनी बरोबर अंगीकारले आहे.
यावेळी उद्योग तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, माजी आमदार रवींद्र फाटक तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The government has brought a wealth of schemes to the Shiv Sena from its doorstep, this is how far the political journey has come!!
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil : जयंत पाटलांचा दावा- एकेका मतदाराला 8-8 वेळा मतदानाचा हक्क; आयोगाचे सर्व्हर दुसरेच कुणीतरी ऑपरेट करत असल्याचा आरोप
- Army Vice Chief : लष्कर उपप्रमुख म्हणाले- 1990 पासून लाखो लोक जम्मू-काश्मीर सोडून गेले, 15,000 नागरिक आणि 3,00 सुरक्षा कर्मचारी मारले गेले
- IMF : FY 26 मध्ये भारताचा जीडीपी 6.6% दराने वाढणार; IMF ने वाढवला जीडीपी वाढीचा अंदाज, म्हटले- भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी
- India Record : देशात जन्मदर घटला, 2023 मध्ये 2.5 कोटी बाळांचा जन्म, 2022च्या तुलनेत 2.32 कोटी कमी; मृत्यूदरात वाढ
Post Your Comment