Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal : मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आला नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याच्या चर्चेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विराम दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत दिल्लीत भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी स्पष्ट केले की, मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे सध्या यावर चर्चा करणे 'जर-तर'च्या प्रश्नासारखे निरर्थक आहे. अशा प्रकारच्या आघाडीची कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. काँग्रेसच्या भूमिकेनुसार, ही आघाडीची चर्चा फक्त इंडिया आघाडीच्या विद्यमान भागीदारांसोबतच पुढे जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Harshvardhan Sapkal  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याच्या चर्चेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विराम दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत दिल्लीत भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी स्पष्ट केले की, मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे सध्या यावर चर्चा करणे ‘जर-तर’च्या प्रश्नासारखे निरर्थक आहे. अशा प्रकारच्या आघाडीची कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. काँग्रेसच्या भूमिकेनुसार, ही आघाडीची चर्चा फक्त इंडिया आघाडीच्या विद्यमान भागीदारांसोबतच पुढे जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.Harshvardhan Sapkal

मनसेच्या युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे का, या प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने इंडिया आघाडीच्या आणि मविआच्या सहकारी पक्षांना जिल्हा स्तरावर आणि स्थानिक पातळीवर चर्चा करण्यास सांगितले आहे. राज्य स्तरावर आम्ही कुठलीही आघाडी किंवा युती करणार नाही. स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवरच सोपवलेली आहे. मनसेच्या प्रस्तावाबाबत टोलवाटोलवी सुरू आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी “अद्याप प्रस्तावच आलेला नाही त्यामुळे टोलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे स्पष्ट केले.Harshvardhan Sapkal



हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला सोबत न घेण्यामागील कारण स्पष्ट करताना इंडिया आघाडीच्या स्थापनेची मूळ तत्त्वे अधोरेखित केली. ते म्हणाले, इंडिया आघाडीची स्थापना भाजपला दूर ठेवून संविधानाचे संरक्षण, संवर्धन करणे आणि भाजपची हुकूमशाही हाणून पाडणे या दोन प्रमुख कारणांसाठी झाली आहे. या मूल्यांवर ज्या पक्षांचा विश्वास आहे, ते सर्वजण इंडिया आघाडीचे घटक आहेत. त्यामुळे, नव्या पक्षाला आघाडीत घ्यायचे असल्यास, केवळ काँग्रेस नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील इतर सर्व मित्रपक्षांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सपकाळ यांनी नमूद केले.

Congress Leader Harshvardhan Sapkal Dismisses MNS Alliance Talks: ‘No Proposal Received, Local Units to Decide on MVA Partners Only’

महत्वाच्या बातम्या

 

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment