Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

महाराष्ट्राचे बांबू उद्योग धोरण जाहीर; 50000 कोटींची गुंतवणूक; 5 लाख रोजगार निर्मिती

महाराष्ट्र बांबू उद्योग धरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंजुरी दिली. फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक निर्णय घेतले. (उद्योग विभाग)

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र बांबू उद्योग धरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज मंजुरी दिली. फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक निर्णय घेतले. (उद्योग विभाग) Maharashtra’s Bamboo

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर. धोरण कालावधीत ५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती. राज्यात १५ समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करणार. कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार. राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना. शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय.

(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजना. सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जिर्णोध्दार, जतन आणि संवर्धन करण्याकरीता नियोजन केले जाणार. मुंबई, छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था, दोन वसतीगृहांचे अद्ययावतीकरण. पाच वर्षांसाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद.

(विधि व न्याय विभाग)

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह, अपील शाखा आणि नागपूर, औरंगाबाद खंडपीठांकरीता गट अ ते ड संवर्गात २ हजार २२८ पदांची निर्मिती. त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता.

Maharashtra’s Bamboo Industry Policy announced

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment