Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

Lalu Prasad Yadav : IRCTC घोटाळा; ऐन निवडणूक हंगामात लालूंसह राबडी, तेजस्वींवर आरोप निश्चित

बिहार निवडणुकीच्या फक्त चार आठवडे आधी दिल्लीच्या न्यायालयाने सोमवारी माजी रेल्वेमंत्री आणि राजदप्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध आयआरसीटीसी हॉटेल जमीन घोटाळ्यात आरोप निश्चित केले.

वृत्तसंस्था

पाटणा : Lalu Prasad Yadav बिहार निवडणुकीच्या फक्त चार आठवडे आधी दिल्लीच्या न्यायालयाने सोमवारी माजी रेल्वेमंत्री आणि राजदप्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध आयआरसीटीसी हॉटेल जमीन घोटाळ्यात आरोप निश्चित केले.Lalu Prasad Yadav

२४४ पानांच्या आदेशात विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी लालूप्रसाद यादव यांना गुन्हेगारी कटाचा सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला. यादव कुटुंबातील तीन सदस्यांसह ११ जणांविरुद्ध गुन्हेगारी कट, फसवणूक, पदाचा गैरवापर आणि सरकारी कर्मचाऱ्यांकडून गुन्हेगारी गैरवर्तनाचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. २७ ऑक्टोबरपासून या खटल्याची दररोज सुनावणी होईल. बिहारमध्ये ६, ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होईल आणि १४ तारखेला निकाल जाहीर होतील. हा युक्तिवाद दुधारी तलवार असल्याचे सांगत न्यायालयाने राजकीय सूडबुद्धीचे आरोप फेटाळून लावले.Lalu Prasad Yadav



 

तेजस्वी म्हणाले, ‘हा राजकीय सूड आहे; लढा सुरूच ठेवेन”

हा राजकीय सूड असल्याचे सांगून तेजस्वी म्हणाले भाजपविरुद्धचा लढा सुरूच ठेवू. ते म्हणाले, “आम्ही आधीच सांगत आलो आहोत की निवडणुका येताच असे खटले उद्भवतील. आम्ही खटल्याला सामोरे जाऊ.”

भाजप म्हणाले, ‘राजदचे शासन मॉडेल घोटाळे व जमीन हडपणारे ’

भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले , “तेजस्वी आणि त्यांच्या कुटुंबावर गरिबांकडून जमीन घेतल्याचा, नोकरीचे आश्वासन देऊन त्यांना फसवल्याचा आरोप आहे. चारा खाणे, कंत्राटांमध्ये फेरफार,जमिनी हडपणे हे राजदचे शासन मॉडेल होते.”

कोर्ट : गंभीर शंका आहे की, लालूंनी लाभासाठी निविदा प्रक्रिया प्रभावित केली

७७ वर्षीय लालूंवर रेल्वेमंत्री असताना सुजाता हॉटेलचे संचालक विजय, विनय कोचरांसह इतरांसोबत गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. त्यांनी रांची, पुरी येथील बीएनआर हॉटेल्सच्या उपभाडे कंत्राटात गैरफायदा घेतला. मोबदल्यात कोचर बंधूंनी पाटण्यातील मौल्यवान जमीन लालूंचे सहकारी प्रेमचंद गुप्तांच्या मालकीच्या कंपनीला विकली. नंतर कंपनी यादव कुटुंबाच्या ताब्यात आली. जमीन त्यांच्या नावावर नाममात्र किमतीत हस्तांतरित झाली. न्यायालयाने म्हटले आहे की, गंभीर शंका आहे की लालूंनी निविदा प्रक्रियेवर प्रभाव पाडल्याने त्यांच्या कुटुंबाला फायदा झाला.

Delhi Court Frames Charges Against Lalu, Rabri, and Tejashwi Yadav in IRCTC Hotel Land Scam Four Weeks Before Bihar Polls

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment