Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान, 12500 रुपयांची सण उचलही मिळणार

राज्यभरातील 85 हजार पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 6 हजार रुपयांची दिवाळी भेट अर्थात सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम 12500 रुपयांची सण उचल देखील मिळणार आहे. इतकेच नव्हे तर वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ST Employees राज्यभरातील 85 हजार पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 6 हजार रुपयांची दिवाळी भेट अर्थात सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम 12500 रुपयांची सण उचल देखील मिळणार आहे. इतकेच नव्हे तर वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.ST Employees

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर अनेक प्रलंबित मागण्यांसाठी ‘चक्का जाम’ आंदोलनाची घोषणा केली होती, ज्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता होती. मात्र, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना 6000 रुपये दिवाळी भेट आणि 12,500 रुपयांची उचल देण्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फरक म्हणून सरासरी 7,500 रुपयांचा वेतनवाढ फरक हप्ता दर महिन्याला देण्याचेही मान्य करण्यात आले आहे. या निर्णयासाठी राज्य सरकार एसटी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देणार असून, यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.ST Employees



एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला स्थगिती

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीमधील 16 संघटना आणि महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनांनी सोमवार, 13 ऑक्टोबर 2025 पासून चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत बहुतांशी मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर, संघटनांनी 13 ऑक्टोबरच्या रात्रीपासून सुरू होणारे चक्का जाम आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

2018 पासून एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरक देण्यात आलेला नाही. सन 2020 ते 2024 या कालावधीतील वेतनवाढ फरकाची रक्कम थकीत आहे. याशिवाय इतर अनेक रक्कमा थकीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची एकूण 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम मिळालेली नाहीत. थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने ही रक्कम एसटीला दिली पाहिजे, अशी मागणीही कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Diwali Bonanza for 85,000 ST Employees: ₹6,000 Ex-Gratia, ₹12,500 Advance, and ₹65 Cr Monthly for Salary Hike Difference Announced by Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment