Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री आठवले यांची मागणी- विनोबा भावेंनी राबवलेली ‘भूदान चळवळ’ पुन्हा सुरू करा; भूमिहीनांना जमीन द्यावी

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भूमिहीनांना जमीन देण्यासाठी राज्यात आणि देशात विनोबा भावे यांनी राबवलेली 'भूदान चळवळ' पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. देशभरात २० कोटी एकर जमीन रिक्त असून, ती भूमिहीनांना देण्यात यावी, असे आठवले म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे गायरान हक्क परिषदेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Ramdas Athawale केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भूमिहीनांना जमीन देण्यासाठी राज्यात आणि देशात विनोबा भावे यांनी राबवलेली ‘भूदान चळवळ’ पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. देशभरात २० कोटी एकर जमीन रिक्त असून, ती भूमिहीनांना देण्यात यावी, असे आठवले म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे गायरान हक्क परिषदेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.Ramdas Athawale

या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, पप्पू कागदे, जिल्हाध्यक्ष विजय मगरे, शहराध्यक्ष नागराज गायकवाड, किशोर थोरात, अरविंद अवसरमल, बाळकृष्ण इंगळे आणि दिलीप पाडमुक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.Ramdas Athawale



यावेळी आठवले यांनी संविधान आणि देशाच्या एकतेवरही भाष्य केले. सरन्यायाधीशांवर बुट फेकल्याच्या घटनेला त्यांनी दुर्दैवी म्हटले. या प्रकरणात संबंधित व्यक्तीवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. “हा देश संविधानावर चालतो. ज्यांना संविधान मान्य नाही, त्यांनी देशाबाहेर जावे,” असे आठवले म्हणाले.

त्यांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेवरही टीका केली. राहुल गांधींनी ‘भारत तोडो’चा नारा दिला होता, असे ते म्हणाले. “सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. जात-धर्म वेगळे असले तरी देश एक आहे. आम्हाला देशाचा अभिमान आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आपला देश नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान किंवा बांगलादेशसारखा होऊ शकत नाही,” असे आठवले यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी होत असल्याबद्दल विचारले असता, आठवले म्हणाले की, त्यांच्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्याही अशाच भेटी व्हाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकर सोबत आल्याशिवाय आंबेडकरी ऐक्य शक्य नाही. रिडालोसच्या वेळीही आंबेडकरी ऐक्याचा प्रयोग केला होता, पण आम्ही दोघे एकत्र आल्याशिवाय ते शक्य नाही. प्रकाश आंबेडकर यांनी याचे नेतृत्व करावे, अशी मागणीही आठवले यांनी केली.

Ramdas Athawale Urges Govt to Relaunch ‘Bhoodan Movement’ to Distribute 20 Crore Acres of Vacant Land to the Landless

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment