Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

तालिबानी अफगाणिस्तानशी भारताचे संबंध सुधारताना राहुल + प्रियांकांच्या पोटात गोळा; म्हणून आला महिला पत्रकारांचा कळवळा!!

तालिबानी अफगाणिस्तानशी भारताचे संबंध सुधारताना राहुल + प्रियांकांच्या पोटात गोळा; म्हणून आला महिला पत्रकारांचा कळवळा!!, असाच प्रकार राजधानी नवी दिल्लीत घडला.

नाशिक : तालिबानी अफगाणिस्तानशी भारताचे संबंध सुधारताना राहुल + प्रियांकांच्या पोटात गोळा; म्हणून आला महिला पत्रकारांचा कळवळा!!, असाच प्रकार राजधानी नवी दिल्लीत घडला. Afghan foreign

अफगाणिस्तानच्या तालिबानी राजवटीचे परराष्ट्रमंत्री मौलवी अमीर खान मुक्तकी भारताच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना डावलले, याविषयी एकदम राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना संताप आला आणि त्यांनी मोदी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. अफगाणिस्तानच्या तालिबानी राजवटीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्यात भारतीय महिला पत्रकारांचा अपमान झाला, असा कांगावा गांधी बहीण – भावाने केला.

– वस्तुस्थिती काय??

यातली वस्तुस्थिती परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट करून सांगितली. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची पत्रकार परिषद ही त्यांच्या दूतावासाने आयोजित केली होती. तिच्याशी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचा किंवा सरकारचा कुठलाही संबंध नव्हता. त्यामुळे त्या पत्रकार परिषदेत कुणाला बोलवायचे आणि कुणाला बोलवायचे नाही, याचा सर्वाधिकार अफगाणिस्तानच्या दूतावासालाच होता. त्यामुळे पत्रकार परिषदेच्या आयोजनात भारतीय सरकारचा अथवा परराष्ट्र मंत्रालयाचा कुठलाही संबंधच नव्हता, असा स्पष्ट खुलासा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केला.

मात्र हा खुलासा ऐकून घेण्यापूर्वीच गांधी बहीण भावांनी मोठ-मोठी ट्विट करून मोदी सरकारला घेरले भारतीय महिला पत्रकारांचा अपमान तुम्ही सहनच कसा केलात??, तो अपमान तुम्हाला डांचला कसा नाही??, असे सवाल केले.

– अफगाणिस्तानशी संबंध सुधारले

वास्तविक यात महिला पत्रकारांचा अपमान वगैरे हा मुद्दाच नव्हता. प्रत्यक्षात अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर भारत सरकारने त्या सरकारशी विशिष्ट अंतर राखून संबंध ठेवले. तिथे फक्त मानवतावादी दृष्टिकोनातून विशिष्ट मदत केली. अफगाणिस्तानातली पहिली तालिबांची राजवट आणि सध्याची तालिबानची राजवट यात गुणात्मक फरक लक्षात घेऊन अफगाणिस्तानामध्ये दूतावासाची पुनर्स्थापना करायचे ठरविले‌. तशी घोषणा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर झालेल्या द्विपक्षीय वाटाघाटींमध्ये केली.



– पाकिस्तान विरोधात अफगाणिस्तान भारताच्या बाजूने

अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या दहशतवाद विरोधातल्या सगळ्या भूमिकेला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी पहलगाम मधल्या हल्ल्याचा निषेध केलाच, पण त्याचबरोबर अफगाणिस्तानची भूमी कोणत्याही दहशतवाद्यांना वापरू देणार नाही. पाकिस्तान बरोबरचे सुद्धा संबंध राजनैतिक ठेवू, लष्करी किंवा दहशतवादी ठेवणार नाही, असा शब्द अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला. यातून त्यांनी अफगाणिस्तानची बदलती भूमिका भारताला कशा पद्धतीने अनुकूल आहे, हेच दाखवून दिले. अफगाणिस्तानातल्या तालिबानी राजवटीत गुणात्मक फरक पडल्याचे चिन्ह यातून दिसले.

– गांधी बहीण – भावाला पोटदुखी का??

त्यानंतर अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आज देवबंदच्या दौऱ्यावर गेले. तिथे त्यांनी मुस्लिम धर्मगुरूंची व्यापक विचारविनिमय केला. भारताच्या सर्व प्रकारच्या भूमिकांना पाठिंबा जाहीर केला. एक प्रकारे मोदी सरकार आणि अफगाणिस्तानची तालिबान राजवट यांच्या एक विशिष्ट सुसंवाद प्रस्थापित झाला. एरवी तालिबानी राजवटीशी विशिष्ट अंतरावरून संबंध ठेवणाऱ्या भारत सरकारने या सुसंवादाच्या आधारे पाकिस्तानला अफगाणिस्तान पासून सुद्धा अलग करून टाकले.

नेमका हाच मुद्दा गांधी बहीण – भावाला खटकला. परंतु थेट अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांवर टीका कशी करायची?, त्याऐवजी कुठलातरी खुसपटी मुद्दा काढून त्यांनी मोदी सरकारला घेरायचा प्रयत्न केला. पण ज्या मुद्द्यामध्ये फारसा दमच नव्हता, तो मुद्दा उचलून गांधी बहीण – भाऊ फसले. कारण गांधी बहीण भावांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर ना अफगाण परराष्ट्र मंत्र्यांनी कुठले प्रत्युत्तर दिले, ना त्यांनी भारताबरोबरच्या संबंधांविषयी कुठले प्रतिकूल मत व्यक्त केले. शिवाय भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट खुलासा करून गांधी बहीण – भावाच्या आरोपामधली हवा काढून घेतली.

Exclusion of women journalist in Afghan foreign minister’s press conference

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment