Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
माहिती जगाची

Cuttack : ओडिशाच्या कटकमध्ये हिंसाचारामुळे मोठा तणाव; प्रतिबंधात्मक आदेश लागू, विहिंप रॅलीत हिंस, 25 जखमी

दसरा मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर ओडिशातील कटक शहर सोमवारी बंद होते. त्यामुळे जातीय तणाव निर्माण झाला. प्रशासनाने १३ पोलिस ठाण्यांच्या परिसरात संचारबंदी लागू केली आणि इंटरनेट सेवा बंद केल्या.

वृत्तसंस्था

कटक : Cuttack  दसरा मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर ओडिशातील कटक शहर सोमवारी बंद होते. त्यामुळे जातीय तणाव निर्माण झाला. प्रशासनाने १३ पोलिस ठाण्यांच्या परिसरात संचारबंदी लागू केली आणि इंटरनेट सेवा बंद केल्या.Cuttack

रविवारी दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर ही कारवाई केली, ज्यामध्ये आठ पोलिसांसह २५ जण जखमी झाले. पोलिस आयुक्त एस. देवदत्त सिंह यांनी सांगितले की, दर्गा बाजार, मंगलाबाग आणि छावणीसह १३ पोलिस ठाण्यांच्या परिसरात संचारबंदी लागू आहे.Cuttack



जिल्हा प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन करून रविवारी संध्याकाळी विहिंपने मोटारसायकल रॅली आयोजित केल्यानंतर हिंसाचाराची ही ताजी घटना घडली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखल्याने सहभागी हिंसक झाले. रॅलीदरम्यान प्रक्षोभक घोषणाबाजी देखील करण्यात आली.

६ आरोपींना अटक, इतरांची ओळख पटवली जातेय

मूर्ती विसर्जन समारंभात झालेल्या हिंसाचार प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे इतरांची ओळख पटवली जात आहे.

Cuttack Shut Down Due to Communal Tension: Curfew in 13 Police Stations After Violence in Durga Immersion Procession

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment