Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??

मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??, असा सवाल मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यामुळे समोर आला. गेल्या काही दिवसांमधला घटनाक्रम आणि मनोज जरांगे यांची आजची शरद पवारांवर थेट टीका यामुळे राजकीय संशय अधिक गडद झाला.

नाशिक : मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??, असा सवाल मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यामुळे समोर आला. गेल्या काही दिवसांमधला घटनाक्रम आणि मनोज जरांगे यांची आजची शरद पवारांवर थेट टीका यामुळे राजकीय संशय अधिक गडद झाला.Is Manoj jarange and Sharad Pawar playing double game over Maratha reservation??

मनोज जरांगे यांनी आज पहिल्यांदाच शरद पवार यांच्यावर जाहीर टीका केली. 1994 मध्ये शरद पवारांनी मराठ्यांचे आरक्षण ओबीसींना देऊन मराठ्यांचे वाटोळे केले पण ज्या ओबीसींना शरद पवारांनी मराठ्यांचे आरक्षण घेऊन त्यांना दिले, त्या ओबीसींनी शरद पवारांचे उपकार ठेवले नाहीत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. पत्रकार परिषदेत त्यांनी नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा टार्गेट केले. फडणवीस सरकारने आश्वासने दिल्याप्रमाणे ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण दिले नाही आणि मराठा कार्यकर्त्यांवरचे गुन्हे मागे घेतले नाहीत तर त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला, पण त्यांनी शरद पवार यांच्यावर मात्र पहिल्यांदाच जाहीरपणे टीका केली.



पवारांनी झटकले होते हात

मनोज जरांगे यांचे आझाद मैदानावरचे आंदोलन हायकोर्टाच्या दबावापुढे मिटल्यानंतर त्यांच्या आंदोलनातली हवा निघून गेली होती. त्यावेळी पहिल्यांदाच शरद पवार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी आमचा कवडीचाही संबंध नसल्याचा दावा केला होता. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते इंधनपुरवठा करतायेत हा आरोप अनेकदा झाला होता. आझाद मैदानावरच्या आंदोलनाच्या वेळी रोहित पवारांच्या मदतीचे काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते. परंतु, शरद पवारांनी त्यांच्या आंदोलनाशी कवडीचाही संबंध नसल्याचा दावा करून हात झटकले होते.

सुप्रिया सुळेंकडून आर्थिक आरक्षणाचे समर्थन

त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आर्थिक आरक्षणाच्या बाजूने आपला कौल असल्याचे जाहीर मुलाखतीत सांगितले होते. ज्यांच्या तीन-तीन पिढ्या शिकल्या त्यांनी आरक्षण मागणे चुकीचे असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. जे गरीब आहेत त्यांनाच आरक्षण देणे योग्य आहे, असे समर्थन त्यांनी केले होते.

नेमका खुलासा सध्या नाही, पण

या राजकीय पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्यावर जाहीर टीका करून त्यांनी मराठ्यांचे वाटोळे केल्याचा आरोप केला. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून अंग काढून घेतल्यानंतर जरांगे यांना शरद पवार यांच्यावर टीका करण्यावाचून पर्यायच राहिला नाही की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पवार आणि आपल्यामध्ये फाटले, हे त्यांना दाखवायचे आहे??, याचा खुलासा सध्या तरी झालेला नाही. पण निवडणुका जवळ आल्यानंतर तो झाल्याशिवाय राहणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अनेकदा भूमिका बदलल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहूनच शालिनीताई पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी केली होती त्यावेळी शरद पवारांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला होता. त्यानंतर अनेकदा शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात वक्तव्ये केली होती. परंतु, महाराष्ट्रात कायमचे विरोधात बसावे लागल्यानंतर विशेषतः भाजपने मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांना बसविल्यानंतर पवारांनी मराठा आंदोलनाला मोठा इंधन पुरवठा केला होता. परंतु पवारांना त्यात राजकीय दृष्ट्या फारसे यश लाभले नाही त्यानंतर पवारांनी त्या आंदोलनापासून आपले हात झटकले होते.

या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले की केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यापुरते तसे दाखविले??, या राजकीय संशयाचे मळभ गडद झाले आहे.

Is Manoj jarange and Sharad Pawar playing double game over Maratha reservation??

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment