Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

Modi @75 : रिटायरमेंटची चर्चा derail, मोदींसमोरच्या नव्या आव्हानांची चर्चा पुन्हा track वर!!

रिटायरमेंटची चर्चा derail, मोदींसमोरच्या नव्या आव्हानांची चर्चा पुन्हा track वर!!, ही नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त घडलेल्या घटना घडामोडींची "अति उच्चशिक्षित बौद्धिक" फलश्रुती ठरली!!

रिटायरमेंटची चर्चा derail, मोदींसमोरच्या नव्या आव्हानांची चर्चा पुन्हा track वर!!, ही नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त घडलेल्या घटना घडामोडींची “अति उच्चशिक्षित बौद्धिक” फलश्रुती ठरली!!

मोदींच्या 75 व्या वर्षाची चर्चा त्यांच्या रिटायरमेंटच्या अंगाने विरोधकांसह त्यांच्या अति उच्चशिक्षित बौद्धिक विरोधकांनी रंगविली होती. मोदी रिटायर्ड झाल्यानंतर काय करणार??, त्यांचा वारस ते स्वतः निवडणार की संघ त्यामध्ये हस्तक्षेप करून मोदींना नको असलेला वारस निवडणार, की संघ आणि मोदी compramise करून आत्तापर्यंत चर्चेत नसलेला वारस पुढे आणणार??, या चर्चांनी सोशल मीडियाचे स्क्रीन भरले होते. वर्तमानपत्रांचे रकाने भरले होते. मोदी जणू काही रिटायर्ड झालेत, आता फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे, असा आव सगळ्यांनी आणला होता. मोदींच्या रिटायरमेंटचे वेगवेगळे पैलू सगळ्यांनी त्यांची रिटायरमेंट गृहीत धरून मांडले होते.

– मोदींच्या रिटायरमेंटचे बंगले कोसळले

पण राजकीय विरोधकांसकट मोदींच्या बौद्धिक विरोधकांनी मोदींच्या रिटायरमेंटचे बांधलेले बंगले एका दिवसात कोसळले. कारण मोदी रिटायर्ड झाले नाहीत. उलट सार्वजनिक कार्यक्रमांमधून नवीन ऊर्जा घेत आणि जागतिक नेत्यांच्या शुभेच्छा घेत मोदींनी नव्या उमेदीने काम सुरू केले. कालच्या दिवसभरातल्या या घटना घडामोडींमुळे मोदींचे बौद्धिक विरोधक खडबडून जागे झाले आणि त्यांनी मोदींच्या रिटायरमेंटची चर्चा रुळांवरून उतरवून ठेवल्या. आणि आता मोदींसमोर नवी कोणती आव्हाने आहेत??, पुढच्या पाच वर्षांमध्ये मोदी काय करतील??, आर्थिक + सामाजिक आणि राजकीय पटलावर कोणते निर्णय घेतील??, त्यांच्या क्षमता कोणत्या आहेत??, उणिवा कोणत्या आहेत??, ते उणीवांवर कसे मात करू शकतील??, स्वतःच्या आणि देशाच्या क्षमता कशा वाढवतील??, या वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा सुरू केली. जे विरोधक मोदींच्या रिटायरमेंटची वाट पाहत होते, त्यांनी मोदींसह आपल्याला भविष्याला सामोरे जावे लागणार आहे याची मनाशी खूणगाठ बांधली. हा मोदींनी त्यांच्या राजकीय आणि बौद्धिक विरोधकांचा केलेला सगळ्यांत मोठा पराभव ठरला.

– मोदी नशीबवान नेते

कुठलाही नेता विरोधकांच्या अडाख्यानुसार वागला, तर तो फारसा मुत्सद्दी नेता मानला जात नाही. उलट विरोधकांचे सगळे आडाखे चुकाविले आणि तो वेगळ्याच वाटेने पुढे निघून गेला, तर त्या नेत्याला मुत्सद्दी मानले जाते. या निकषावर मोदी सध्याच्या बौद्धिक निम्नस्तराच्या नेत्यांच्या फार पुढे निघून गेले, हे मान्य करावे लागेल. कारण मोदी एकीकडे जसे कर्तृत्ववान आणि कामामधले सातत्य टिकवून ठेवणारे नेते आहेत, त्याचप्रमाणे ते अत्यंत नशीबवान नेते आहेत, की ज्यांना समोर बिनडोक विरोधक मिळाले आहेत. त्यामुळे विरोधकांवर मोदी लीलया मात करू शकतात, हे त्यांनी गेल्या 11 वर्षांमध्ये दिल्लीत, आणि 14 वर्षांमध्ये गुजरातमध्ये अनेकदा दाखवून दिले. त्याचेच मोठे version मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त दिसले.



मोदींच्या समोरची खरी आव्हाने

केवळ व्यापारी वृत्तीच्या आर्थिक सुधारणांवर न थांबता किंवा समाधान न मानता आणखी व्यापक आर्थिक सुधारणा घडविणे.

त्या व्यापक आर्थिक सुधारणांमध्ये वेग आणणे, कामगार आणि कृषी क्षेत्रांमध्ये सखोल सुधारणा घडवून आणणे.

लोकप्रिय घोषणा आणि आर्थिक शिस्त यांच्यात समन्वय साधणे.

त्याचबरोबर सामाजिक पातळीवर जात समाज घटकाचा प्रभाव कमी करून संघाला अभिप्रेत असलेल्या सर्वसमावेशक हिंदुत्वाचा प्रभाव दीर्घकालीन टिकवून धरणे ही मोदींच्या समोरची मोठी आव्हाने आहेत.

अशा चर्चा काही बौद्धिक माध्यमांनी रंगविल्या. त्यात आंतरराष्ट्रीय राजकारणाची चांगली सरमिसळ त्यांनी केली. या चर्चांमध्ये तथ्य निश्चित आहे. कारण मोदींची पुढची राजवटही आव्हानांनी निश्चितच भरलेली आहे, जी आव्हाने पेलणे अजिबात सोपे नाही, पण म्हणून मोदींसारखे सातत्य टिकवून ठेवणारे नेते अवसान गाळूनही बसणार नाही. उलट ते अधिक गंभीरपणे, धीराने आणि धीम्या गतीने आव्हानांना सामोरे जातील, हे मोदींच्या बौद्धिक विरोधकांना मान्य करावे लागले, हेच मोदींच्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचे मोठे यश ठरले.

What are the new challenges for Modi government in next 5 years??

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment