विशेष प्रतिनिधी
परभणी : Parbhani ऑनलाइन माध्यमातून होत असलेल्या दहशतवादी कारवाया आणि संशयास्पद हालचालींच्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी पहाटे परभणी शहरात मोठी कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील एटीएसच्या पथकाने पहाटे तीन वाजता शहरातील १५ वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागाच्या संशयावरून १२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.Parbhani
या कारवाईसाठी २६ अधिकाऱ्यांचे पथक ५ क्रूझर गाड्यांमधून परभणीत दाखल झाले होते. शहरातील धार रोड परिसरातील मुमताज कॉलनी, जनता मार्केटच्या राजकोट स्वीट्सच्या बाजूचे मशिनरी दुकान, नोबल हँडलूम दुकानाजवळ पथकाने धाडी टाकल्या. संशयितांकडून कागदपत्रे, गॅजेट्स, साहित्य जप्त केले.
गुप्त मोहीम, मार्किंग
कारवाईसाठी वापरलेल्या पाचही क्रूझर गाड्यांवर ए, बी, सी, डी अशा प्रकारची विशेष मार्किंग केली होती. अत्यंत गुप्तता बाळगून आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई करण्यात आली.
Anti-Terror Crackdown: Maharashtra ATS Raids 15 Locations in Parbhani
महत्वाच्या बातम्या
- Nashik Corporate : नाशिक कॉर्पोरेट जिहाद:धर्मांतराचा डाव, अविवाहित असल्याचे नाटक केल्याचे पुरावे कोर्टात सादर,
- पवनराजे हत्याकांडाचा निकाल; काँग्रेस मधल्या जुन्या राजकारणाचे झेंगट आता शिवसेना – भाजपच्या गळ्यात!!
- Monsoon : मान्सून 23 जून रोजी तेलंगणातून पुढे सरकेल:महाराष्ट्रात मान्सून आणणारी प्रणाली सक्रिय
- Pradeep Kurulkar : प्रदीप कुरुलकरविरुद्ध दोषारोप झाले निश्चित:जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीस सुरुवात



Post Your Comment