Trending News

No trending news found.

Thursday, 11 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

कॉकरोचला मारायला विरोधकच धावले; धर्मेंद्र प्रधानांच्या (न झालेल्या) राजीनाम्याचे श्रेय घेण्यासाठी भांडले!!

कॉकरोचला मारायला विरोधकच धावले; धर्मेंद्र प्रधानांच्या (न झालेल्या) राजीनाम्याचे श्रेय घेण्यासाठी भांडले!!, हेच राजकीय सत्य संजय राऊत यांच्या आजच्या तथाकथित खळबळजनक दाव्याने उघड्यावर आले.

नाशिक : कॉकरोचला मारायला विरोधकच धावले; धर्मेंद्र प्रधानांच्या (न झालेल्या) राजीनाम्याचे श्रेय घेण्यासाठी भांडले!!, हेच राजकीय सत्य संजय राऊत यांच्या आजच्या तथाकथित खळबळजनक दाव्याने उघड्यावर आले. cockroach janataparty

– नरेंद्र मोदी – अभिजीत दिपके भेटीचा दावा

संजय राऊत यांनी आज नियमित पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत एक भलताच खळबळजनक दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणे अमेरिकेत अभिजीत दिपकेला भेटले. त्यांच्यात भलीमोठी गूढ चर्चा झाली आणि त्यानंतरच अभिजीत दिपके कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करून भारतात आंदोलन करण्यासाठी आला. मोदी आणि दिपके यांच्या भेटीचे फोटो एका अज्ञात व्यक्तीने आपल्याला पाठविले, असा दावा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे राऊतनिष्ठ पत्रकारांनी या बातमीचा फुगा फुगवून तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हवेत सोडला. त्यामुळे भाजप आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्यातल्या राजकीय साट्या-लोट्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. पण महत्त्वाचे म्हणजे संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि अभिजीत दिपके यांच्या भेटीचे फोटो पत्रकारांना बिलकुल दाखविले नाहीत. किंवा पत्रकारांनी सुद्धा ते फोटो आम्हाला दाखवा असा आग्रह धरल्याचे दिसले नाही.



– काँग्रेसचा श्रेयवाद

पण त्या पलीकडे जाऊन संजय राऊत यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या न झालेल्या राजीनाम्याचे श्रेय काँग्रेसला देऊन टाकले. वास्तविक “नीट” परीक्षेतील घोटाळ्या संदर्भात काँग्रेसने देशभर आंदोलन उभे केले होते. त्याचे पडसाद देखील तरुणांमध्ये उमटले होते. तरुणांचा काँग्रेसला वाढता पाठिंबा मिळत होता. त्याला अटकाव करण्यासाठीच कॉकरोच जनता पार्टीचे खुळ मध्येच काढण्यात आल्याचे संजय राऊत अप्रत्यक्षपणे बोलून गेले.

– कॉकरोचला मारायला विरोधक धावले

संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे “नीट” परीक्षेतला घोटाळा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा (न झालेला) राजीनामा यातल्या राजकारणाचे श्रेय घ्यायचा वाद उघड्यावर आला. “नीट” परीक्षेच्या घोटाळ्याची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांनी अजून राजीनामा दिलेला नाही. मोदींनी सुद्धा त्यांना बडतर्फ केलेले नाही. पण यदा कदाचित मोदींनी धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ केले किंवा त्यांचा राजीनामा घेतला, तर त्याचे श्रेय कॉकरोच जनता पार्टीच्या खात्यात जाईल. त्यामुळे सगळ्या विरोधकांना रिकाम्या हाताने शंख करावा लागेल, या भीतीने संजय राऊत यांनी परस्पर नरेंद्र मोदी आणि अभिजीत दिपके यांचा बादरायणी संबंध जोडून टाकला. अशाप्रकारे कॉकरोच जनता पार्टीला मारायला विरोधक धावले. विरोधकांनीच भाजपचे काम परस्पर करून टाकले. कॉकरोच जनता पार्टी आणि विरोधी पक्ष यांच्यातले श्रेय वादाचे भांडण उघड्यावर आले.

Opposition spray hit on cockroach janataparty

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment