Trending News

No trending news found.

Tuesday, 9 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Ashok Kharat’ : भोंदू अशोक खरातची 13.92 कोटींची रोकड, फार्महाऊस, मर्सिडीज कार जप्त; 26 मेपर्यंत ईडी कोठडीत

स्वतःला देवाचा अवतार सांगून आणि काळ्या जादूची भीती दाखवून भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ “कॅप्टन” याला अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली असून, सध्या तो २६ मे २०२६ पर्यंत ७ दिवसांच्या ईडी कोठडीत आहे. ईडीने केलेल्या छापेमारीत खरातकडून तब्बल १३.९२ कोटी रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि लक्झरी मर्सिडीज अमेरिकन डॉलर असा कोटयावधीचे घबाड जप्त केले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ashok Kharat स्वतःला देवाचा अवतार सांगून आणि काळ्या जादूची भीती दाखवून भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ “कॅप्टन” याला अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली असून, सध्या तो २६ मे २०२६ पर्यंत ७ दिवसांच्या ईडी कोठडीत आहे. ईडीने केलेल्या छापेमारीत खरातकडून तब्बल १३.९२ कोटी रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि लक्झरी मर्सिडीज अमेरिकन डॉलर असा कोटयावधीचे घबाड जप्त केले आहे.Ashok Kharat

तपासाची व्याप्ती वाढवत शिर्डी, राहता आणि अहिल्यानगर येथील गुन्हेही यात जोडण्यात आले. या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा मुख्य गुन्हा सिद्ध होत असल्याने ईडीने यात उडी घेतली. १३ एप्रिल ते १८ मे २०२६ दरम्यान ईडीने आरोपी आणि त्याच्या साथीदारांच्या निवासस्थानांवर, व्यावसायिक ठिकाणांवर आणि बँक लॉकर्सवर मोठे छापे टाकले. ईडीच्या छापेमारीत घबाड हस्तगत करण्यात आले आहे.Ashok Kharat



अमेरिकेत खरातने घेतले वैद्यकीय उपचार

खरात स्वतःला भगवान शिवाचा अवतार सांगायचा. लोकांमध्ये काळी जादू आणि मृत्यूची भीती निर्माण करून, त्यांच्याकडून ‘अवतार पूजा’, धार्मिक उपचार आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळत होता. खरातने केवळ एका तक्रारदाराकडून तब्बल ५.६२ कोटी रुपये उकळले होते. या पैशातून त्याने लक्झरी मर्सिडीज कार खरेदी केली, परदेश वाऱ्या केल्या, अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेतले आणि आलिशान फार्महाऊस विकसित केल्याचे तपासात समोर आले आहे.

Supreme Court Strict Directives on Solid Waste Management Rules 2026

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment