Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

KEM : ‘केईएम’चे नामांतर होणार; मुंबई मनपा प्रशासनाचा हिरवा कंदील; ठाकरे शिवसेनेच्या विरोधानंतरही लोढांच्या मागणीला यश

मुंबई महानगरपालिकेच्या 'किंग एडवर्ड मेमोरियल' (केईएम) या ब्रिटीशकालीन रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला आता पालिका प्रशासनाने अधिकृतपणे हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडलेला हा प्रस्ताव आरोग्य समितीच्या मंजुरीनंतर पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता. आयुक्तांनी याला संमती दर्शवल्यामुळे आता हे रुग्णालय 'कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' या नावाने ओळखले जाईल.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :KEM  मुंबई महानगरपालिकेच्या ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ (केईएम) या ब्रिटीशकालीन रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला आता पालिका प्रशासनाने अधिकृतपणे हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडलेला हा प्रस्ताव आरोग्य समितीच्या मंजुरीनंतर पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता. आयुक्तांनी याला संमती दर्शवल्यामुळे आता हे रुग्णालय ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ या नावाने ओळखले जाईल.KEM

रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २९ मार्च २०२६ रोजी महापौरांना आणि आरोग्य समितीला पत्र लिहून मागणी केली होती. शुक्रवारी झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन त्याला मंजुरी देण्यात आली. समितीच्या निर्णयावर अंतिम मोहोर उमटवण्यासाठी तो पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. आयुक्तांनी या प्रस्तावाला तांत्रिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून संमती दिली आहे.KEM



स्वदेशी विचारांचा आग्रह

१९२६ मध्ये स्थापन झालेल्या या ऐतिहासिक संस्थेचे नाव ब्रिटीश राजाच्या नावावर होते. बदलत्या काळानुसार आणि स्वदेशी विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या संस्थेला भारतीय संस्कृतीशी निगडित नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. विशेष म्हणजे, ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ असे नाव सुचवताना मूळ ‘KEM’ हे संक्षिप्त रूप बदलणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

राजकीय संघर्षाकडे दुर्लक्ष

या नामांतराच्या प्रस्तावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला होता. मुंबईचा इतिहास आणि ऐतिहासिक वास्तूंची ओळख पुसली जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. मात्र, प्रशासकीय पातळीवर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, आरोग्य समितीचा निर्णय अंतिम राहील. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या विरोधाला न जुमानता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

KEM’ to be renamed; Mumbai Municipal Corporation administration gives green light; Lodha’s demand succeeds despite Thackeray Shiv Sena’s opposition

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment