Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Sadavarte : परिवहन खातं पंक्चर झालं का? गुणरत्न सदवार्तेंचा प्रताप सरनाईकांसह राज ठाकरेंवर निशाणा

मुंबईतील रिक्षाचालकांसाठी 1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय आता लांबणीवर पडला असून, रिक्षाचालकांना तयारीसाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक पवित्रा घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राज ठाकरे यांना या मुदतवाढीवरून उपरोधिकपणे डिवचले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sadavarte मुंबईतील रिक्षाचालकांसाठी 1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय आता लांबणीवर पडला असून, रिक्षाचालकांना तयारीसाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक पवित्रा घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राज ठाकरे यांना या मुदतवाढीवरून उपरोधिकपणे डिवचले आहे.Sadavarte

गुणरत्न सदवार्ते म्हणाले, प्रथम देश ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात आणि कायद्यात आहे. आपण काय करतो याचं भान माणसाला राहत नाही तेव्हा अक्षम्य गोष्टी हातून होतात. त्यातली बाब म्हणजे सरनाईकांच्या विभागाने चूक करुन दाखवली. आम्ही साततत्याने म्हणत होतो तुम्हाला बंदी घालता येणार नाही. आज काय केलं, फुस्सससस, फुस्सससस. परिवहन खातं आज पंक्चर झालं का हा माझा प्रश्न आहे. राज ठाकरे सारख्या माणसाने काय केलं पाहा, सरनाईक तुम्ही रिस्पॉसेबल आहात. निरुपमला त्रास देणाऱ्या लोकांना बोलावून सत्कार केला.Sadavarte



आज रिक्षावाला कष्टकरी जिंकलेला आहे

मी राज ठाकरेंची निंदा करतो, संजय निरुपमवर हल्ला करणाऱ्यांचा सत्कार होत असेल तर प्रताप सरनाईकांची जबाबदारी काय? असा सवाल गुणरत्न सदवार्ते यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, प्रताप सरनाईक तुम्ही काहीच करू शकणार नाही. कोणत्याही रिक्षावाल्याने आज घाबरण्याची गरज नाही. कुणाला त्रास झाला तर हेल्पलाईन नंबर आम्ही दिला आहे, त्यावर संपर्क करा. परिवहन विभागात जे काही पाहायला मिळालं अतिशय चुकीचं होतं. सरनाईक कॅन्सल म्हणायचे आणि मला ते कॅन्सर असं वाटायचं आज रिक्षावाला कष्टकरी जिंकलेला आहे.

कायदाच नाही तर निर्णय कसा जाहीर करणार?

पुढे बोलताना गुणरत्न सदवार्ते म्हणाले, कायदाच नाही तर सरनाईक कोणता आणि कसला निर्णय जाहीर करणार? प्रेस नोट काय कायदा आहे का?, परिवहन खात्याने सर्कुलर काढलं म्हणजे कायदा होत नाही, डंके की चोट पे सांगत आहे. या सगळ्या पादऱ्या गोष्टी होत्या, राज ठाकरे बिळातून निघाला आणि फणा काढणं सुरु झालं. यात एक महिला गहिवरुन गेलीय, मध्यरात्री अतिक्रमण होतंय. ती महिला नाव घेत आहे सरनाईकचं, काळ्या रंगाचा उल्लेख करतेय. अशा प्रकारचा कार्यक्रम चालत असेल तर अतिशय दुख:द आहे.

मला धमकी दिली..

गुणरत्न सदावर्ते यांनी पुढे म्हटले की, भाईंदर पाडा येथील घटना आहे, सरनाईकांकडून आणि त्यांच्या गुंडाकडून जमिनी बळकवण्यात आली आहे. लोकं परेशान झाले आहेत. असा माणूस मी कधीही पाहिलेला नाही, आमदार मेहता यांनी प्रताप सरनाईक मंत्री राहू नये इथपर्यंत मागणी केली आहे. प्रताप सरनाईक यांची केस एका दक्षिणात्य मंत्र्याच्या सिमिलर केस आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन उच्च न्यायालयात जावं लागेल, मला धमकी दिली एका चॅनलवर. प्रताप सरनाईक माझा एक बाल बाका करु शकत नाही.

“Is Transport Dept Punctured?”: Sadavarte Slams Sarnaik and Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment