विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. मेट्रो – ५ ( ठाणे – भिवंडी – कल्याण ) प्रकल्पातील विस्तारित मार्गिकेसाठी १८ हजार १३० कोटींच्या निधीला मंजूरी मिळाली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही माहिती दिली.
या विस्तारीत मार्गिकेमध्ये मेट्रो ५ ही धामणकर नाका ते दुर्गाडी आणि तसेच कल्याण रेल्वे स्थानकापासून खडकपाडा मार्गे उल्हासनगर इथपर्यंत धावणार आहे. यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर येथील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. उल्हासनगर, कल्याण येथील प्रवाशांना थेट ठाणे गाठणे अधिक सोपे होणार आहे.
याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. तर ही विस्तारित मार्गिका निश्चित मंजूर होणार याबाबत एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता. त्याचीच पूर्तता करत आज या मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारित मार्गिकेला निधीची मंजुरी मिळाली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांचे आभार मानले.
याच मेट्रो मार्गिकेचा उल्हासनगर ते बदलापूर असा विस्तार देखील दृष्टीपथात आहे. यामुळे कल्याण पलीकडच्या प्रवाशांना देखील भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये नमूद केले.
Deputy Chief Minister Eknathji Shindeni Dilaela Shabd Complete



Post Your Comment