Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Amravati Horror : अमरावतीत खळबळजनक घटना; 180 तरुणींचे लैंगिक शोषण आणि 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल; आरोपी मोहम्मद अयाजला बेड्या

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

विशेष प्रतिनिधी

अमरावती : Amravati Horror  अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.Amravati Horror

या प्रकरणात काही गंभीर दावेही करण्यात आले आहेत. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी आरोपीने तब्बल १८० तरुणींचे शोषण केले असून ३५० अश्लील व्हिडिओ तयार करून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. या दाव्यांची सत्यता तपासाचा भाग असून पोलिसांनी या सर्व बाबींची चौकशी सुरू केली आहे.Amravati Horror



पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणा आता या प्रकरणामागे आणखी कोणी आहे का, याचा शोध घेत आहे.

अनिल बोंडे यांनी आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचाही आरोप केला आहे. तसेच हे केवळ एका व्यक्तीचे काम नसून यामागे मोठे जाळे असू शकते, असा दावा त्यांनी केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ग्रुप तयार करून हे प्रकार चालत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यातील डेटा तपासला जात आहे. मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. काही डेटा डिलीट करण्यात आला असला तरी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तो पुन्हा मिळवण्याचे काम सुरू आहे.

प्राथमिक चौकशीत आरोपीने गेल्या एक वर्षापासून हे प्रकार सुरू असल्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच सात पीडित तरुणींची नावेही समोर आल्याची माहिती आहे. पोलिस आता संभाव्य पीडितांची ओळख पटवणे, डिजिटल पुरावे गोळा करणे आणि संपूर्ण जाळ्याचा तपास करणे यावर भर देत आहेत.

हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलिस प्रशासनाकडून सखोल तपास सुरू असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Amravati Horror: Mohammad Ayaz Arrested for Exploiting 180 Women

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment