Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

पटेल + तटकरेंना शिव्या घाला; बारामतीत सुनेत्रा पवारांचे नेतृत्व लादा; बॅनर बाजीतून सगळा प्रकार उघडा!!

पटेल + तटकरेंना शिव्या घाला बारामती सुनेत्रा पवारांचे नेतृत्व लादा!!, असला प्रकार आज बारामतीतून समोर आला.

विशेष प्रतिनिधी

नाशिक : पटेल + तटकरेंना शिव्या घाला बारामती सुनेत्रा पवारांचे नेतृत्व लादा!!, असला प्रकार आज बारामतीतून समोर आला. Sunetra Pawar

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण त्याआधी बारामतीतल्या अजितदादा समर्थक निनावी कार्यकर्त्यांनी बारामतीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना शिव्या घालणारा बॅनर लावला. त्यामुळे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपल्या स्वार्थासाठी वापरा आणि नंतर फेकून द्या, ही पवारांची खरी राजकीय प्रवृत्ती बाहेर आली.



बॅनरवर काय आहे?

अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या या बॅनरवर लिहिण्यात आले आहे की,   “अजित दादांचे फक्त नावच पुरेसे आहे, घातकी तटकरे-पटेलची गरज नाही… समस्त दादा प्रेमी!”

या बॅनरच्या माध्यमातून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेख ‘घातकी’ असा करण्यात आला असून, अजितदादांच्या समर्थकांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी असल्याचे संकेत मिळत आहेत.

उमेदवारी अर्जापूर्वीच अंतर्गत वाद चव्हाट्यावर

सुनेत्रा पवार आज शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार असतानाच अशा प्रकारचे बॅनर लागणे, हे राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अजितदादांच्या मूळ समर्थकांमध्ये बाहेरील किंवा इतर नेत्यांच्या हस्तक्षेपावरून नाराजी असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. या पोटनिवडणुकीत महायुती एकसंघ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असतानाच, या बॅनरमुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळाला.

कोणाचे कारस्थान?

हे बॅनर खरोखरच अजित दादांच्या समर्थकांनी लावले आहेत की विरोधकांनी महायुतीत फूट पाडण्यासाठी हा डाव आखला आहे, असा देखील प्रश्न आहे.  मात्र, या बॅनरमुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिमेला धक्का लावून सुनेत्रा पवारांचे नेतृत्व प्रस्थापित करायचा डाव खेळण्याचे मात्र उघड झाले.

abuses on Patel and Tatkare; impose Sunetra Pawar’s leadership in Baramati.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment