Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

लाल टी-शर्ट मध्ये मारली स्टालिन अण्णांनी स्टाईल; भाजी मंडई शिरून मारली राहुल गांधींची कॉपी!!

लाल टी-शर्ट मध्ये मारली स्टालिन अण्णांनी स्टाईल; भाजी मंडई शिरून मारली राहुल गांधींची कॉपी!!, असे आज तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात घडले.

नाशिक : लाल टी-शर्ट मध्ये मारली स्टालिन अण्णांनी स्टाईल; भाजी मंडई शिरून मारली राहुल गांधींची कॉपी!!, असे आज तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात घडले.Stalin styled Anna in a red T-shirt; copied Rahul Gandhi by entering the vegetable market!!

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के‌. स्टालिन यांनी आज सकाळी आपल्या द्रविड मुन्नेत्र कळघमचा प्रचार करताना तिरुचिरापल्लीतील गांधीनगर मधील मंडई गाठली. सकाळी अचानक मुख्यमंत्री आलेले पाहून मंडईतले भाजी विक्रेते आणि ग्राहक आवाक झाले. सगळ्यांनी आपापले मोबाईल काढून मुख्यमंत्र्यांचे चित्रीकरण केले. मुख्यमंत्र्यांनी देखील शक्य तेवढ्या सगळ्यांशी हस्तांदोलन केले. भाजी विक्रेत्यांची आणि ग्राहकांची विचारपूस केली.



– लाल टी-शर्ट घालून प्रचारात

एम. के. स्टालिन यांनी यावेळी जोरदार स्टाईल मारली. ते लाल टी-शर्ट मध्ये मंडईमध्ये पोहोचले होते. एम. के. स्टालिन हे शक्यतो पांढरा शर्ट आणि पांढरा मुंडू म्हणजे धोतीमध्ये वावरतात. मध्यंतरी त्यांनी परदेश दौरा केला, त्यावेळी त्यांनी थ्री पीस सूट परिधान केला होता.

– राहुल गांधींची मंडई सफर

पण तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतला तिरुचिरापल्ली मधला प्रचार करताना स्टालिन यांनी मात्र राहुल गांधींची कॉपी मारली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधी असेच एका भाजी मंडई पोहोचले होते. त्यावेळी लसणाचे भाव गगनाला भिडले होते. राहुल गांधींनी दिल्लीतल्या भाजी मंडईत जाऊन लसणालाच हात घातला होता. त्यावेळी तिथल्या व्यापाऱ्यांनी आणि ग्राहकांनी राहुल गांधींकडे मोदी सरकार विरुद्ध जोरदार तक्रारी केल्या होत्या. राहुल गांधी त्यावेळी नेहमीप्रमाणे पांढऱ्या टी-शर्ट मध्ये होते.

– कम्युनिस्ट हुकूमशाह स्टालिनचे आकर्षण

एम. के. स्टालिन यांनी राहुल गांधींचे टी-शर्ट घालायची कॉपी केली, फक्त तो लाल टी-शर्ट होता. स्टालिन यांना लाल रंगाचे आकर्षण असणे सुद्धा स्वाभाविक आहे. कारण त्यांचे वडील एम. करुणानिधी यांनी स्टालिन यांचे नाव “स्टालिन” ठेवण्याचे कारण त्यांना रशियाचा कम्युनिस्ट हुकूमशहा स्टालिन याचे फार आकर्षण होते. त्या स्टालिनची आठवण राहावी म्हणून करुणानिधी यांनी आपल्या मुलाचे नाव स्टालिन ठेवले. त्यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची विचारसरणी सुद्धा कम्युनिस्ट प्रणित धर्मविरोधीच ठेवली. त्यामुळे एम. के. स्टालिन यांनी लाल टी-शर्ट घालून प्रचार केला, यात त्यांच्या दृष्टीने काही वेगळे घडले नाही. फक्त त्यांनी टी शर्ट घालून प्रचार करून राहुल गांधींची कॉपी मारली एवढेच!! बाकी त्यांनी काँग्रेसच्या पदरात फक्त 28 जागा घातल्यात, हा भाग अलहिदा!!

Stalin styled Anna in a red T-shirt; copied Rahul Gandhi by entering the vegetable market!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment