Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कुणी??; वंचित बहुजन आघाडीचा बोचरा सवाल

ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कुणी??, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज केला. सुजात आंबेडकर यांनी सोशल मीडिया हँडलवर सविस्तर पोस्ट लिहून ठाकरे बंधूंच्या राजकारणावर सडकून टीका केली.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कुणी??, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज केला. सुजात आंबेडकर यांनी सोशल मीडिया हँडलवर सविस्तर पोस्ट लिहून ठाकरे बंधूंच्या राजकारणावर सडकून टीका केली. Vanchit Bahujan Aghadi

– सुजात आंबेडकर यांची पोस्ट अशी :

भाजपचा ब्रोकर म्हणून काम करणारा मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला काल आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. हा तोच मोहित कंबोज आहे, ज्याने महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेना आमदार गुवाहाटीला पळवून नेण्यात हात होता.

मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही तर स्वतःच पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करताय. मराठी माणूस, मराठी अस्मिताच्या नावाने गप्पा मारणारे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी किती मराठी शाळा उघडल्या?



मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जात असताना मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्तेत असणारे उद्धव ठाकरे यांनी काय केले? यांच्या नाकर्तेपणामुळे मराठी माणूस हद्दपार झाला. मुंबई महानगरपालिकेत किती मराठी कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केले? किती मराठी उद्योगपती निर्माण केले?

बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीय लोकांविरोधात ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ म्हणून आंदोलन केले, त्यांचेच नातू आदित्य ठाकरे हे लुंगी घालून दक्षिण भारतीय लोकांच्या मतांसाठी फिरत होते. जेव्हा यांना गुजराती लोकांची मतं हवी होती, तेव्हा हे ‘केम छो वरली’ म्हणत गुजराती मतांसाठी लोटांगण घालत होते. जेव्हा यांचा पक्ष अडचणीत आला, तेव्हा मराठी मतांसाठी मराठी अस्मितेचे राजकारण करू लागले. बीएमसीमध्ये 25 वर्ष सत्तेत असतांना यांना मराठी माणूस आठवला नाही.

6 डिसेंबरला चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला येणारे लोकं ही सुद्धा मराठीच असतात, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात राहणारे राज ठाकरे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक मुंबई सोडून बाहेर पळून जातात. तेव्हा कुठे जाते तुमची मराठी अस्मिता?

जेव्हा यांचा पक्ष व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा-तेव्हा ते मराठी लोकांच्या नावाने राजकारण करतात. अशा भामट्या लोकांपासून सावधान!

“Who, exactly, gave the Thackerays the ‘monopoly’ over the Marathi language?” — A scathing question from the Vanchit Bahujan Aghadi.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment