
नाशिक : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा राजकीय इतिहासाविरुद्ध जाणारा दावा समोर आलाय. त्यामुळे तामिळनाडूच्या इतिहासातले एक वेगळेच परिवर्तन 2026 च्या विधानसभा निवडणुकीतून घडायची शक्यता निर्माण झालीय. S. Gurumurthy
– तामिळनाडूच्या राजकारणाचे हेलकावे
तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात कधीच त्रिशंकू विधानसभा आली नाही. तामिळनाडूने कायम द्रविडी पक्षांना बहुमत दिले आणि 1960 च्या दशकापूर्वी काँग्रेसला बहुमत दिले त्यामुळे तामिळनाडूत कायम पूर्ण बहुमताचे किंबहुना राक्षसी बहुमताचे सरकार येत राहिले. द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम अशा दोन पक्षांच्या राजकारणामध्ये तामिळनाडूने कायम हेलकावे खाल्ले. करुणानिधी आणि जयललिता आणि काही काळ एम. जी. रामचंद्रन यांनीच तामिळनाडूच्या राजकारणावर एकहाती कब्जा करून ठेवला होता. यांच्यापेक्षा अन्य कुणाही नेत्याला तामिळनाडू वर दीर्घकाळ राजकीय कब्जा करता आला नव्हता. करुणानिधी चार वेळा आणि जय ललिता तीन वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले ते पूर्ण बहुमतानिशीच बनले होते. त्यांना कधीच कुठल्या राष्ट्रीय पक्षांच्या कुबड्यांची गरज लागली नव्हती. उलट काँग्रेस आणि भाजप यांच्यासारख्या राष्ट्रीय पक्षांना करुणानिधी आणि जयललिता यांची गरज भासली म्हणून त्यांनी या दोन्ही नेत्यांची कायमच तडजोडी केल्या.
एस. गुरुमुर्तींचा दावा
पण 2026 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र तामिळनाडूत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा धक्कादायक दावा समोर आला. तामिळनाडूतील तुगलक मासिकाचे संपादक एस. गुरुमुर्ती यांनी हा दावा केला. तामिळनाडू मध्ये प्रथमच म्हणजे 2026 मध्ये अशी स्थिती आली आहे की तिथे कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. बहुमत मिळाले तर कुठल्यातरी आघाडीलाच मिळेल. थलपती विजय याचा तामिळनाडूत प्रभाव असला तरी तो एकटा द्रविड मुन्नेत्र कळघमचा पराभव करू शकणार नाही. त्यामुळे तामिळनाडूतली जनता त्याच्या पक्षाला मत देऊन आपले मत वाया घालवणार नाही. उलट अण्णा द्रविड मुन्नेत्र आणि भाजप यांच्या युतीला मतदान करून द्रविड मुन्नेत्र कळघमचा पराभव करायचा प्रयत्न करेल. कारण द्रविड मुन्नेत्र कळघम भारत विरोधी पक्ष आहे, असा दावा एस. गुरुमुर्ती यांनी केला.
EP-400 with S. Gurumurthy premieres today at 5 PM IST
“There will be no single-party majority in the 2026 Tamil Nadu Assembly polls.”
“People don’t see Vijay defeating the DMK, so even if they like him, they prefer not to ‘waste’ their vote and instead back the AIADMK and BJP.”… pic.twitter.com/0Q1BFECDoz
— ANI (@ANI) March 24, 2026
– तामिळनाडूचा इतिहास नाही अस्थिर सरकारांचा
गुरुमूर्ती यांनी 2026 च्या राजकीय परिस्थितीचे आकलन करून हा दावा केला असला तरी त्या दाव्याला तामिळनाडूतल्या राजकीय इतिहासाचा पाठिंबा नाही. कारण गेल्या 50 वर्षांमध्ये किंबहुना त्याच्याही आधीपासून तामिळनाडूतल्या जनतेने कधीही त्रिशंकू विधानसभेच्या कौल दिला नाही उलट द्रविड मुनेत्र कळघम किंवा अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम यापैकी एका पक्षाला कायम बहुमत दिले. 2026 मध्ये तमिळ राजकारणाने खरंच कूस बदलली असेल, तरच गुरुमुर्तींचा दावा सिद्ध होईल अन्यथा तामिळनाडू आपल्या पुण्यात जुन्या मार्गाने जाऊन कुठल्यातरी एका पक्षाला बहुमत देईल.
S. Gurumurthy premieres 2026 Tamil Nadu Assembly polls.
महत्वाच्या बातम्या
- हल्ले तात्पुरते थांबवायच्या ट्रम्प यांच्या घोषणेवर इराणचा अविश्वास!!
- घरगुती गॅस सिलेंडर मधल्या गॅसच्या वजनात घट??; तसला कोणताही प्रस्ताव नाही, मोदी सरकारचा खुलासा!!
- WB Supplementary : बंगालमध्ये आज सप्लिमेंटरी मतदार यादी येण्याची शक्यता; 27 लाख मतदारांवर परिणाम
- तमिळ अस्मितेच्या राजकारणात राष्ट्रीय पक्षांची 12 % वर वाताहत!!



Post Your Comment