Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनीच पाडली त्यांच्या पक्षात फुट; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे टार्गेटवर!!

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनीच त्यांच्या पक्षात पाडली फूट; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना केले टार्गेट!!, असे आज घडून आल्याचे दिसले.

 

नाशिक : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनीच त्यांच्या पक्षात पाडली फूट; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना केले टार्गेट!!, असे आज घडून आल्याचे दिसले.The workers who joined Ajit Pawar’s NCP caused a split in his party; Praful Patel and Sunil Tatkare targeted!!

विनायक मेटे यांचे कार्यकर्ते उदयकुमार आहेर या मराठा कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली ज्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यात बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार भाषणे केली. या बैठकीच्या पोस्टरवर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर यांचे फोटोच नव्हते. नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्याबरोबरच अजित पवारांचा फोटो तिथे होता, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नेते म्हणून पोस्टरवर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर यांचे फोटो नव्हते, तर त्यांच्या ऐवजी फक्त सुनेत्रा पवार पार्थ पवार यांचेच फोटो त्यावर होते.



– प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंवर राग

आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार शरसंधान साधले. अजित पवार यांच्याकडे पाहून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता पण त्यांच्या अकाली एक्झिट नंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलो तरी पोरके झालोत, असे वक्तव्य उदयकुमार आहेर यांनी केले. आमचे म्हणणे ऐकून घेईल, असा एकही मराठा नेता पक्ष कार्यालयात उपस्थित नसतो. आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी दोन किंवा तीन मराठा पदाधिकारी पक्षाच्या कार्यालयात पाहिजेत, अशी मागणी उदयकुमार आहेर यांनी केली.

– मराठा कार्यकर्त्यांचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठल्याही बाबीसाठी आम्हाला विचारले जात नाही. सुनील तटकरे यांच्या भेटीची वेळ मागितली, तर ते भेटीची वेळ देत नाहीत. कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळण्याच्या अपेक्षा असते, पण तो देखील मिळत नाही. कार्यकर्त्यांना अशीच उपेक्षेची वागणूक मिळाली, तर त्याचे परिणाम पक्षाला भोगायला लागतील, असा इशारा सुद्धा उदयकुमार आहेर यांनी दिला.

– इतर नेत्यांच्या समर्थनासाठी पवार पुढे येत नाहीत

अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळे काही अलबेल नाही. नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सत्ता उपभोगायला मिळत असली, तरी त्यांचा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना विरोधात जातीय आधारावर प्रचंड विरोध आहे. नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फक्त सत्ता आणि पवारांचे नेतृत्व हवे आहे. त्यासाठी नेते आणि कार्यकर्ते पक्षात फूट पाडायला ही मागे पुढे पाहणार नाहीत. पवार कुटुंबीयांमधले कुणीही नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या बाजूने बोलायला पुढे येणार नाहीत, ही बाब आजच्या बैठकीतून ठळकपणे समोर आली.

The workers who joined Ajit Pawar’s NCP caused a split in his party; Praful Patel and Sunil Tatkare targeted!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment