Trending News

No trending news found.

Tuesday, 10 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांना लागतोय कुठला ना कुठला टेकू; म्हणून तर दिल्लीत दोन्ही डगरींवर पाय ठेवू!!

राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांना लागतोय कुठला ना कुठला टेकू; म्हणून तर दिल्लीत दोन्ही डगरींवर पाय ठेवू!!, असला प्रकार समोर आलाय.

नाशिक : राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांना लागतोय कुठला ना कुठला टेकू; म्हणून तर दिल्लीत दोन्ही डगरींवर पाय ठेवू!!, असला प्रकार समोर आलाय.Pawar needs some kind of support to maintain his political existence; so he will keep his feet on both sides in Delhi!!

– अजितदादांच्या पक्षाला भाजपचा टेकू

राष्ट्रवादी काँग्रेस मधले आपले स्वतःचे खच्चीकरण थांबवायला अजित पवारांनी भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा आधार घेतला. अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर सुनेत्रा पवारांनी तोच वारसा पुढे चालविला. भाजपच्याच सत्तेच्या टेकूच्या आधारावर त्यांनी स्वतःकडे उपमुख्यमंत्री पद घेतले. पार्थला राज्यसभेवर पाठविले. अजितदादांच्या कुटुंबीयांनी हे सगळे स्वतःचा राजकीय आधार टिकवून ठेवण्यासाठी केले. कारण त्यांना स्वतंत्रपणे स्वतःचा राजकीय आधार टिकवून ठेवता आला नसता म्हणूनच त्यांनी भाजपचा टेकू मुकाट्याने घेतला.



– पवारांना घ्यावा लागला काँग्रेस – ठाकरे सेनेचा आधार

पण शरद पवारांची अवस्था सुद्धा काही वेगळी राहिली नाही. त्यांना राज्यसभेवर पोहोचण्यासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा टेकू घ्यावा लागला. काँग्रेस आणि ठाकरे यांनी उदार अंतःकरणाने तो टेकू पवारांना दिला. पण त्यामुळे पवारांचे स्वतंत्र राजकारण उभे राहण्याची शक्यता नाही म्हणूनच पवारांना आता दिल्लीत काँग्रेसचा टेकू घेणे अपरिहार्य वाटू लागले. यातूनच पवारांनी नवा डाव टाकत काँग्रेसशी जुळवून घेण्याचे पत्ते खोलले.

– विलीनीकरण न झाल्यामुळे…

याच दरम्यानच्या काळात त्यांनी सुनेच्या पक्षाचा टेकू घ्यायचा प्रयत्न केला, पण सुनेने पवारांना हिंग लावून विचारले नाही. कारण सुनेची स्वतंत्र निर्णय घेण्याची तेवढी राजकीय क्षमताच उरली नाही. म्हणून तर कुठल्याही पवारांना भाजप किंवा काँग्रेस यांच्या टेकू शिवाय राजकीय अस्तित्व टिकवून ठेवणे अवघड बनले.

– पवार शोधताहेत काँग्रेसचा आधार

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या कुटुंबाने भाजपचा टेकू घेतला, तर पवार आता काँग्रेसचा टेकू घ्यायच्या मागे लागले. म्हणून तर त्यांनी रोहित पवारांना अजित पवारांच्या अपघाताचा विषय दिल्लीपर्यंत नेऊन लावून धरायला सांगितले. रोहित पवारांनी दिल्लीत अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याच, पण ते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचले. मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांनी रोहित पवारांसारख्या ज्युनियर नेत्याला दारातही उभे केले नसते पण केवळ अजित पवार यांच्या अपघाताच्या विषयाच्या निमित्ताने त्यांना तिथपर्यंत पोहोचता आले. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होत नसेल, त्यामुळे आपले राजकीय भवितव्य तरी धोक्यात येऊ नये म्हणून रोहित पवारांनी काँग्रेसी वळणाचा मार्ग पत्करला. किंबहुना त्यांना तो पत्करावा लागला.

– सुप्रिया सुळे – जयशंकर भेट

पण त्याच वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतल्या आखातात अडकलेल्या नागरिकांचा प्रश्न घेऊन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे घर गाठले. आखातात अडकलेल्या बारामतीतल्या नागरिकांना लवकरात लवकर परत आणायची गळ सुप्रिया सुळे यांनी जयशंकर यांना घातली.

वास्तविक आखातामध्ये अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाय योजना आधीच केल्यात, पण बारामती मतदारसंघातल्या नागरिकांसाठी आपण काहीतरी करतोय, हे दाखवण्यासाठी सुप्रिया सुळे जयशंकर यांच्या भेटीला पोहोचल्या. या भेटीचा फोटो सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला. यातून त्यांनी आपला reach परराष्ट्र मंत्र्यांपर्यंत आहे, हे भासवायचा प्रयत्न केला.

– स्वबळाचे अवसान संपले

पण रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या दिल्लीतल्या भेटीगाठींवरून हेच राजकीय सत्य समोर आले, की कुठल्याही पवारांना आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी कुठला ना कुठला टेकू घ्यावा लागतो आहे. स्वतंत्रपणे स्वबळावर आणि स्वकर्तृत्वावर राजकारण उभे करायची पवारांची आता क्षमता उरलेली नाही.

Pawar needs some kind of support to maintain his political existence; so he will keep his feet on both sides in Delhi!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment