
नाशिक : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह तुतारीच्या अनावरणासाठी तब्बल 40 वर्षांनी रायगडावर गेले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या 9 मार्च 2016 रोजी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रायगडावर जाणार आहेत. राज ठाकरे यांनी स्वतःच सोशल मीडिया पोस्ट मधून हे जाहीर केले.
– राज ठाकरे यांचे आवाहन
9 मार्च मनसेचा वर्धापन दिन या निमित्ताने राज ठाकरे अनेकदा मिळावे घेत असतात पण यावेळी ते रायगडावर जाणार आहेत. त्यांच्या समवेत मनसेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी फौजही असणार आहे. येत्या 10 मार्चपासून मनसेचे सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार असून सर्व महाराष्ट्र प्रेमींनी मनसेच्या सदस्य नोंदणीत सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट मधून केले. केवळ मनसेच्या कार्यालयात किंवा कार्यालयाच्या बूथ टाकून सदस्य नोंदणी करण्यावर समाधान मानू नका तर बाजारात जाऊन बागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष नागरिकांमध्ये जाऊन सदस्य नोंदणी करा असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले.
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,आपल्या पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत…
— Raj Thackeray (@RajThackeray) March 8, 2026
– नवा पायंडा
पण राज ठाकरे मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त रायगडावर जाणार असल्याने एक वेगळीच बाब समोर आली. किंबहुना एक नवी राजकीय फॅशन समोर आली. कारण आत्तापर्यंत कुठल्याही पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कुणीही नेता रायगडावर गेलेला आढळला नाही. कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही पक्षांचे वर्धापन दिन मेळाव्यांमधून किंवा कुठल्यातरी सेवा कार्यांमधून किंवा फार मोठे इव्हेंट करून साजरे केले.
– तुतारी चिन्हाचे अनावरण
पण शरद पवारांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शप) म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचे अनावरण रायगडावर जाऊन केले होते त्यावेळी सुद्धा त्यांच्या समवेत त्यांच्या पक्षातल्या नेत्यांची मोठी फौज होती. शरद पवारांचे वय झाले असल्याने ते डोलीतून रायगडावर पोहोचले होते आपण तब्बल 40 वर्षांनी रायगडावर आल्याचे शरद पवारांनी बोटांच्या खुणा करून पत्रकारांना सांगितले होते.
– तुताऱ्या वाजल्या पिपाण्यांसारख्या
त्यावेळी शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तुताऱ्या फुंकून तुतारी चिन्हाचे अनावरण केले होते. परंतु त्यांच्या बहुतेक सहकाऱ्यांच्या तुताऱ्या पिपाण्यांसारख्या वाजल्याने अनेकांनी त्या इव्हेंटची सोशल मीडियावर खिल्ली उडवली होती. पण तुतारी चिन्हाच्या अनावरणाच्या निमित्ताने शरद पवारांनी रायगडावर दौरा करून नवा पायंडा पाडल्याचेच दिसून आले कारण राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त रायगडाचा दौरा शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकल्याचे दिसले.
अर्थात शरद पवारांनी रायगडावर जाऊन तुतारी चिन्हाच्या अनावरण केले, तरी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीच्या दृष्टीने फारसा फायदा झाल्याचे दिसले नाही. उलट विधानसभा निवडणुकीत त्यांना फक्त 10 आमदार निवडून आणता आले. त्या उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 आमदार निवडून आणले.
आता राज ठाकरे सुद्धा शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकून रायगडावर जाऊन त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना भविष्यात किती यश मिळते??, याची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.
Raj Thackeray to Raigad tomorrow for MNS member registration
महत्वाच्या बातम्या
- Anil Ambani : अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरच्या ठिकाणांवर ईडीचा छापा; सकाळ होण्यापूर्वीच १५ पथके पोहोचली
- Global Alert : इराण युद्धाच्या झळा, तुर्कीवर हल्ल्यानंतर नाटो देश सतर्क, पाकिस्तानवरही युद्धात उतरण्याचा दबाव
- विलीनीकरण होत नाही, तर बात सोडा; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आतून पोखरा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा फंडा!!
- Inside Story : सुनेच्या पक्षाने झिडकारले, पण काँग्रेस हायकमांडने तारले, त्यामुळेच शरद पवार राज्यसभेत पोहोचले!!



Post Your Comment