Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

आठवण अजितदादांची, पण महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर छाप देवेंद्र फडणवीसांची!!

नाशिक : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आज मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिट मुळे निर्माण झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अपवादात्मक परिस्थितीत महाराष्ट्राचा 2026 – 2027 सालचा अर्थसंकल्प सादर करावा लागला. अजितदादांची आवर्जून आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करायला उठले, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवार अमर रहेच्या घोषणा विधानसभेत दिल्या. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अजित पवारांची भावपूर्ण आठवण काढली. अजित पवारांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करड्या शिस्तीमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था रुळावर राहिली. त्यांची आठवण आमच्या मनात कायम राहील, असे सांगितले. अजित पवारांच्या नावाने त्यांनी दोन […]

नाशिक : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आज मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिट मुळे निर्माण झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अपवादात्मक परिस्थितीत महाराष्ट्राचा 2026 – 2027 सालचा अर्थसंकल्प सादर करावा लागला.

अजितदादांची आवर्जून आठवण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करायला उठले, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवार अमर रहेच्या घोषणा विधानसभेत दिल्या. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अजित पवारांची भावपूर्ण आठवण काढली. अजित पवारांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करड्या शिस्तीमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था रुळावर राहिली. त्यांची आठवण आमच्या मनात कायम राहील, असे सांगितले. अजित पवारांच्या नावाने त्यांनी दोन घोषणा सुद्धा केल्या. यात अजित पवारांचे उचित स्मारक बांधायचा समावेश होता. त्याचबरोबर अजित पवारांच्या नावाने गतिमान नागरी प्रशासन सेवा पुरस्कार द्यायच्या घोषणेचा देखील समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी यंदाचा अर्थसंकल्प अजित पवारांनाच समर्पित केला.

अर्थसंकल्पातील तरतुदींवर मुख्यमंत्र्यांची छाप

पण त्या पलीकडे जाऊन या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींवर बारकाईने नजर टाकली तर महाराष्ट्राच्या या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छाप स्पष्ट दिसून आली. किंबहुना महायुती सरकारच्या प्रत्येक अर्थसंकल्पावर अगदी अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच छाप राहिली.

 पायाभूत सुविधांवर भर

कारण देवेंद्र फडणवीस यांना ज्या Infra Man नावाने ओळखले जाते, त्या महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या घोषणा केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तीच परंपरा कायम ठेवली. त्यांनी मुंबई क्रमांक तीन आणि मुंबई क्रमांक चार उभारण्याच्या घोषणा केल्या. त्यासाठी भरीव तरतुदी सुद्धा केल्या. 50 लाख रोजगारांची निर्मिती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर भर आणि बळ देणाऱ्या अर्थव्यवस्थेला चालना, देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर एवढी होताना त्यात महाराष्ट्राचा वाटा एक ट्रिलियन डॉलरच्या पेक्षा अधिक करण्यासाठी करायचे प्रयत्न, जागतिक पर्यटनात महाराष्ट्राचा वाटा वाढविण्यावर भर, त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, कृषी क्षेत्रातल्या भांडवली गुंतवणुकीमध्ये कमी करून प्रत्यक्ष उत्पादनात वाढ करणे, शेतकरी आणि महिलांसाठी अभिनय योजना काढून त्यांना शेतीसह अन्य महत्त्वपूर्ण कामांमध्ये मोठा सहभाग देणे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला बळ, मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी भरीव तरतूद यासारख्या घोषणांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला.

 शेतकरी कर्जमाफीचा पाळला शब्द

त्याचवेळी शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी करायची घोषणा सुद्धा केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असा शब्द त्यांनीच 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिला होता. तो शब्द मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात पाळला. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी 2026 27 चा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांची आठवण काढली असली, प्रत्यक्षात त्यांचीच छाप या अर्थसंकल्पावर राहिली.

Maharashtra Budget 2026 today arthsankalp infrastructure announcements devendra fadnavis

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment