Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांचा गट भाजपच्या अदृश्य शक्तींच्या मागल्या दारी??

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांचा गट भाजपच्या अदृश्य शक्तींच्या मागल्या दारी??, असा सवाल ऐन मोक्याच्या क्षणी समोर आलाय.

नाशिक : राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांचा गट भाजपच्या अदृश्य शक्तींच्या मागल्या दारी??, असा सवाल ऐन मोक्याच्या क्षणी समोर आलाय. कारण सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांनी दिल्ली आणि मुंबईत आणि अगदी मातोश्रीच्या दारात लॉगिन करून सुद्धा महाविकास आघाडीने शरद पवार यांची उमेदवारी जाहीर केली नाही, पण काहीही करून राज्यसभा मिळवायचीच या शरद पवारांच्या हट्टापोटी अखेर शरद पवारांचा गट भाजपच्या आदर्श शक्तीच्या मागल्या दारी गेलाय, हीच राजकीय वस्तुस्थिती आज समोर आली.

– पवारांना राज्यसभा खासदारकीची हाव

शरद पवारांच्या उमेदवारीसाठी भाजपच्याच अदृश्य शक्ती पडद्या मागून कार्यरत असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या, पण प्रत्यक्षात शरद पवारांची राज्यसभा खासदारकीची हावच त्यांना भाजपच्या अदृश्य शक्तींच्या मागच्या दाराशी घेऊन गेली ही राजकीय वस्तुस्थिती “पवार बुद्धीची” मराठी माध्यमे विसरली. शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीमुळे महाविकास आघाडीचे काँग्रेस आणि ठाकरे यांची शिवसेना हे दोन घटक पक्ष नाराजच राहतील आणि या निमित्ताने ठाकरेंच्या उमेदवाराला अपशकुन करता येईल, याचा आनंद भाजपच्या नेत्यांना झालाय, अशी मखलाशी मराठी माध्यमांनी केली. या मखलाशीत काही अंशी सत्य असले, तरी राजकीय वस्तुस्थिती हीच राहिली ती म्हणजे शरद पवारांना राज्यसभा खासदारकीची हाव सुटायची ती सुटलीच. फक्त ती मराठी माध्यमांनी बातम्यांमध्ये नमूद केली नाही.

– मातोश्रीचा उंबरठा लागला झिजवावा

एरवी शरद पवारांनी नुसती इच्छा जरी व्यक्त केली असती तरी त्यांच्या राजकीय प्रभावाच्या दबावाखाली काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी सहजपणे त्यांच्यापुढे मान तुकवली असती पण शरद पवार महाविकास आघाडीत आता तिसऱ्या क्रमांकाच्या गटाचे नेते असल्याने शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांच्यासारख्या आमदारांनी सुद्धा शरद पवारांच्या नावाला आव्हान द्यायचा “डाव” खेळला. म्हणून तर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांना मातोश्रीचा उंबरठा झिजवावा लागला. या दोन्ही नेत्यांना उद्धव ठाकरे यांच्या दाराशी जावे लागले. शरद पवारांच्या उमेदवारीसाठी तुम्ही राज्यसभेची जागा सोडा, अशी विनंती करावी लागली.

– काँग्रेसने कापली पवारांची उमेदवारी

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी तर उद्धव ठाकरे यांना परस्पर फोन करून काँग्रेसला राज्यसभा द्या आणि तुम्ही विधानपरिषद घ्या अशी ऑफर देऊन शरद पवारांचा पत्ता परस्पर कापला. याला कारणीभूत शरद पवारांचे आत्तापर्यंतचे “डावच” ठरले शरद पवार आत्तापर्यंत महाविकास आघाडीचे एकमुखी नेते म्हणून वावरत होते, पण भाजपलाच डोळा मारत होते. त्यामुळे शरद पवार महाविकास आघाडीतून राज्यसभेवर निवडून येणार आणि भाजपलाच डोळा मारत बसणार असला प्रकार होणार असेल तर त्यांना महाविकास आघाडीतून उमेदवारीच द्यायला नको, असा “डाव” काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने खेळला.

– काँग्रेस आणि ठाकरेंना खिचवण्याचा भाजपचा डाव

पण काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना खिजविण्यासाठीच भाजपला शरद पवारांची राज्यसभा उमेदवारी हवी आहे म्हणून तर भाजपची अदृश्य शक्ती स्वतःचे राज्यसभा उमेदवार जाहीर करण्यासाठी संयमाने वाट बघत आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी नाईलाजाने का होईना, पण शरद पवारांना उमेदवारी दिली, तरी त्यांची नाराजी कायम राहणार असल्याने महाविकास आघाडी फूट पडलेलीच राहील आणि पवारांना उमेदवारी नाही दिली, त्यांच्या ऐवजी शिवसेना किंवा काँग्रेसच्या नेत्याला उमेदवारी दिली, तर भाजप आपला सातवा उमेदवार मैदानात उतरवून काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांचा पराभव करण्याची खेळी करेल. त्यामुळे फायदा भाजपचा आणि शरद पवारांचा होईल. काँग्रेस आणि शिवसेना तोट्यात जातील. पण एवढे सगळे राजकारण करण्यासाठी शरद पवारांच्या गटाला भाजपच्या अदृश्य शक्तींच्या मागच्या दारापाशी जाऊन उभे राहावे लागेल.

Sharad Pawar’s group for Rajya Sabha candidacy behind the backdoor of BJP’s invisible forces??

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment