Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

शरद पवारांची राज्यसभा खासदारकी; सुप्रिया सुळे, जयंत पाटील मातोश्रीच्या दारापाशी!!

शरद पवारांची राज्यसभा खासदारकी; सुप्रिया सुळे, जयंत पाटील मातोश्रीच्या दारापाशी!!, अशी राजकीय घडामोड रात्री घडली. शरद पवारांना राज्यसभेचे खासदारकी द्या, अशी मागणी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्री बंगल्यावर जाऊन करावी लागली. पण उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांना लगेच सकारात्मक प्रतिसाद दिल्याची अधिकृत बातमी नाही. उलट काँग्रेसने शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला, तर विचार करता येईल, असे उत्तर त्यांनी या दोन्ही नेत्यांना दिल्याचे बातम्यांमधून दिसून आले.

नाशिक : शरद पवारांची राज्यसभा खासदारकी; सुप्रिया सुळे, जयंत पाटील मातोश्रीच्या दारापाशी!!, अशी राजकीय घडामोड रात्री घडली. शरद पवारांना राज्यसभेचे खासदारकी द्या, अशी मागणी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्री बंगल्यावर जाऊन करावी लागली. पण उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांना लगेच सकारात्मक प्रतिसाद दिल्याची अधिकृत बातमी नाही. उलट काँग्रेसने शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला, तर विचार करता येईल, असे उत्तर त्यांनी या दोन्ही नेत्यांना दिल्याचे बातम्यांमधून दिसून आले.Sharad Pawar’s Rajya Sabha MP; Supriya Sule, Jayant Patil at Matoshree’s door!!

– काँग्रेसने कापले पवारांचे नाव

त्याआधी सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या याच राज्यसभा खासदारकीसाठी दिल्लीमध्ये लॉबिंग करावे लागले होते.

पण सुप्रिया सुळे यांच्या या लॉबिंग नंतर सुद्धा काँग्रेसचे दिल्लीतले नेते बधले नव्हते. उलट काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून काँग्रेसला राज्यसभा द्यावी आणि शिवसेनेने विधान परिषद घ्यावी, असा प्रस्ताव देऊन शरद पवारांचे नाव परस्पर कापले होते. पवारांच्या ऐवजी काँग्रेसने पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही धरला.



तरीसुद्धा सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी प्रयत्न न सोडता काल सायंकाळी मातोश्री बंगल्यावर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना शरद पवारांच्या खासदारकीसाठी गळ घातली. पण उद्धव ठाकरे यांच्याकडून अधिकृतरित्या कुठलाही शब्द बाहेर आला नाही.

– आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई पवारांच्या विरोधात

मूळात शरद पवारांसारख्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहिलेल्या ज्येष्ठ नेत्याच्या राज्यसभा खासदारकीसाठी त्यांच्या मुलीला आणि बाकीच्या नेत्यांना लॉबिंग करावे लागते, हीच खरी बातमी आहे. कारण शिवसेनेच्या दोन तरुण नेत्यांनी म्हणजे आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांनी जाहीरपणे भूमिका घेऊन शिवसेना आता राज्यसभा जागेचा “त्याग” करणार नाही. राज्यसभेच्या जागेवर शिवसेनेचा हक्क आहे कारण फौजिया खान यांच्या निवडणुकीच्या वेळी स्वतः शरद पवारांनीच शिवसेनेच्या हक्काची जागा मागितली होती. ती त्यावेळी शिवसेनेने दिली. आता शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर शिवसेनेचा हक्क आहे असे आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांनी शरद पवारांविषयी आदर व्यक्त करून सांगितले.

त्यामुळेच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीसाठी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घ्यावी लागली. त्याचबरोबर या दोन्ही नेत्यांना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांना काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांच्या सुद्धा नाकदूऱ्या काढाव्या लागल्या.

Sharad Pawar’s Rajya Sabha MP; Supriya Sule, Jayant Patil at Matoshree’s door!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment