Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
माहिती जगाची

अमेरिकेच्या इराण वरच्या हल्ल्यामुळे चीनचा लष्करी, आर्थिक आणि तंत्रज्ञानातल्या वर्चस्वाचा फुटला फुगा!!

अमेरिकेने इराणवर हल्ला करून त्यांचा सर्वोच्च नेता आयतुल्लाह खामेनी याला संपवल्यामुळे अरब जगतातला चिनी लष्करी आर्थिक तंत्रज्ञानातल्या वर्चस्वाचा फुगा कायमचा फुटला.

नाशिक : अमेरिकेने इराणवर हल्ला करून त्यांचा सर्वोच्च नेता आयतुल्लाह खामेनी याला संपवल्यामुळे अरब जगतातला चिनी लष्करी आर्थिक तंत्रज्ञानातल्या वर्चस्वाचा फुगा कायमचा फुटला. चीनने इराणला तेलाच्या बदल्यात शस्त्रास्त्रे या कराराच्या नावाखाली सर्व प्रकारची क्षेपणास्त्रे पुरवली. इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम विकसित करायला मदत केली. त्यांना अणू तंत्रज्ञान सुद्धा पुरविले. परंतु, अमेरिका आणि इजरायलच्या हल्ल्यातून इराणचे संरक्षण करायला चिनी बनावटीच्या लष्करी सामग्रीचा काहीही उपयोग झाला नाही. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता मारला जायचा, तो मारला गेलाच.

– चीनची 90% तेल खरेदी बंद

अमेरिकेने इराणवर केलेले हल्ल्यामुळे खुद्द इराणी राजवटीचे नुकसान झालेच, पण त्या पलीकडे जाऊन चीनचे सुद्धा मोठे नुकसान झाले. कारण तेलाच्या बदलात शस्त्रास्त्रे या कराराच्या नावाखाली चीन इराणकडून तब्बल 90% तेल खरेदी करत होता. आता तेलाचा तो मार्ग बंद झालाय आणि इराण मध्ये अमेरिकेचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर तो कायमचा बंद होईल. इराणमध्ये अमेरिकेला अनुकूल असलेली राजवट प्रस्थापित झाल्यानंतर ती राजवट चीनची तेलाच्या बदल्यात शस्त्रास्त्रे हा करार जसाच्या तसा चालू ठेवू शकणार नाही. त्यामुळे चीन आणि इराण त्यांच्यातले वेगवेगळे करार देखील संपुष्टात येतील. त्यामुळे आधीच अडचणीत आलेली चिनी अर्थव्यवस्था इराणी तेल बंद झाल्यामुळे आणखी अडचणीत येईल.



– चिनी बनावटीची एअर डिफेन्स सिस्टीम भेदली

तेलाच्या बदल्यात शस्त्रास्त्रे या कराराच्या नावाखाली चीनने इराणला फक्त क्षेपणास्त्रेच पुरवली नाहीत, तर त्यांना अणू तंत्रज्ञान दिले त्याचबरोबर एअर डिफेन्स सिस्टीम दिली पण त्या सिस्टीमचा इराणला काहीही उपयोग झाला नाही. इराणचे संपूर्ण लष्कर आपल्या सर्वोच्च नेत्याचा बचाव करू शकले नाही. इजरायल आणि अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी इराणकडे असलेली चिनी बनावटीची एअर डिफेन्स सिस्टीम सहज भेदून त्यांच्या सर्वोच्च नेत्याचा बळी घेतला. त्यावेळी चिनी लष्कर इराणच्या मदतीला धावून आले नाही.

– चीनची शस्त्रास्त्रे पाकिस्तान मध्ये सुद्धा फेल

इराणने पाकिस्तानला सुद्धा अशाच स्वरूपाची सर्व प्रकारची लष्करी मदत केली पाकिस्तानला एअर डिफेन्स सिस्टीम दिली वेगवेगळी क्षेपणास्त्रे दिली पण ऑपरेशन सिंदूर दरम्यान सगळी चिनी शस्त्रास्त्रे आणि एअर डिफेन्स सिस्टीम फेल गेली. चिनी लष्करी सामग्री पाकिस्तानचे भारतापासून संरक्षण करू शकली नाही.

– चिनी तंत्रज्ञानाचा बुडबुडा फुटला

चीनने आत्तापर्यंत पश्चिम आशिया मधल्या अरब देशांना आणि आफ्रिकेतल्या अनेक देशांना आपल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर फसविले अनेकांशी वेगवेगळे लष्करी सामग्री निर्यातीचे करार केले पण इराण आणि पाकिस्तान या दोन महत्त्वाच्या देशांना चीनने दिलेली लष्करी सामग्री उपयोगी ठरली नाही. चिनी बनावटीची लष्करी सामग्री इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे रक्षण करू शकली नाही. अमेरिका आणि इजरायल हे दोन देश लष्करी सामग्री तंत्रज्ञानात चीनला भारी पडले. त्यामुळे जगभरातल्या चिनी लष्करी सामग्री तंत्रज्ञानातला वर्चस्वाचा बुडबुडा कायमचा फुटला.

US attack on Iran failed Chinese defence system

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment