Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

अजितदादांना न्याय देण्याच्या बहाण्याने रोहित पवारांचे बारामतीत शक्तिप्रदर्शन; साथीला अजितदादांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढलेले युगेंद्र पवार!!

नाशिक : अजितदादांना न्याय मिळवण्याची मागणी बारामतीत रोहित पवारांच्या शक्ती प्रदर्शनात परावर्तित आणि साथीला अजितदादांविरुद्ध विधानसभा निवडणूक लढले युगेंद्र पवार!!, असे राजकीय चित्र समोर आले. […]

नाशिक : अजितदादांना न्याय मिळवण्याची मागणी बारामतीत रोहित पवारांच्या शक्ती प्रदर्शनात परावर्तित आणि साथीला अजितदादांविरुद्ध विधानसभा निवडणूक लढले युगेंद्र पवार!!, असे राजकीय चित्र समोर आले.

सुरुवातीला अजित पवारांना न्याय मिळावा, अशी मागणी हाताशी धरून रोहित पवारांनी आक्रमक भूमिका धारण केली, पण आता त्या आक्रमक भूमिकेचे रूपांतर शक्ती प्रदर्शनात झाले असून बारामतीत रोहित पवारांच्या समर्थकांनी पोलीस स्टेशनला अक्षरशः घेराव घातला.

– रोहित पवारांचा मुंबईत पोलीस स्टेशन मध्ये राडा

त्याआधी रोहित पवारांनी कालच मुंबईत मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FIR दाखल करायचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी साथीला आमदार अमोल मिटकरी यांना घेतले होते. परंतु, मरीन ड्राईव्ह पोलिसांनी कायद्याच्या कसोटीवर ठाम राहून DGCI आणि संबंधित VSR विरुद्ध FIR दाखल करून घ्यायला नकार दिला. पोलिसांनी या दोन्ही घटकांविरुद्ध रोहित पवारांचा तक्रार अर्ज दाखल करून घ्यायला मान्यता दिली होती. परंतु रोहित पवार तक्रार अर्जाच्या पलीकडे जाऊन DGCI आणि VSR कंपनी यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यासाठी आक्रमक राहिले. त्यांनी तिथे पोलीस अधिकाऱ्यांची मोठ्या आवाजात वाद सुद्धा घातला. पण रोहित पवारांच्या दमदाटीचा काही उपयोग झाला नाही. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी व्हीएसआर कंपनी विरुद्ध FIR दाखल करून घेतला नाही.

– बारामती शक्तिप्रदर्शन

त्यामुळेच आज सकाळी रोहित पवारांनी बारामती या पवारांच्याच बालेकिल्लात जाऊन रोहित पवारांनी FIR दाखल करण्याची “खेळी” केली. त्यानिमित्ताने बारामती त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून घेतले. अजित पवारांना न्याय द्यायचा असेल, तर तो आपणच मिळवून देऊ शकतो, अशी प्रतिमा निर्मिती करायची खेळी त्यांनी केली. यावेळी त्यांनी साथीला युगेंद्र पवारांना घेतले. हे तेच युगेंद्र पवार आहेत, ज्यांनी अजित पवारांच्या विरोधात बारामती विधानसभा निवडणूक लढवली होती. आज रोहित आणि युगेंद्र अशा दोन्ही भावांनी अजित पवारांच्या राजकीय वारसा मध्ये शक्ती प्रदर्शनाद्वारे घुसखोरी करायचा “डाव” खेळला.

– सुप्रिया सुळेंचे वडिलांच्या खासदारकीसाठी लॉबिंग

बारामती हे राजकीय महाभारत सुरू असताना सुप्रिया सुळे मात्र त्यापासून पूर्ण अलिप्त राहिल्या असून त्यांनी रोहित पवार यांच्या विषयी फार अभिमान दाखवला आहे. रोहित पवार अजित पवारांच्या विमाना अपघाताविषयी ज्या पद्धतीने पाठपुरावा करतो आहे त्याचा मला अभिमान वाटतो, असे वक्तव्य त्यांनी कालच दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत केले. पण मुंबई आणि बारामतीतल्या घडामोडींपासून त्यांनी स्वतःला अलग ठेवून घेतले. उलट त्यांनी फक्त शरद पवारांच्या राज्यसभेच्या खासदारकीसाठी दिल्ली आणि मुंबईत लॉबिंग करण्यात धन्यता मानली.

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment