Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

शरद पवारांचा राजकीय वारस ठरणे दूरच; अजितदादांचा राजकीय वारसा चालविण्यात राजकीय घुसखोरी!!

शरद पवारांचा राजकीय वारस ठरणे दूरच; अजितदादांच्याच राजकीय वारसा चालविण्यात राजकीय घुसखोरी करायचा प्रकार समोर आलाय.

नाशिक : शरद पवारांचा राजकीय वारस ठरणे दूरच; अजितदादांच्याच राजकीय वारसा चालविण्यात राजकीय घुसखोरी करायचा प्रकार समोर आलाय. आमदार रोहित पवारांनी अजित पवारांप्रमाणेच दर मंगळवारी जनता दरबार भरवायचे ठरविले आहे. तसे पत्रकच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मंगळवारी प्रसिद्ध केले. Rohit Pawar

अजित पवार उपमुख्यमंत्री असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना ते दर मंगळवारी मुंबईत जनता दरबार भरवायचे जे प्रश्न सोडवता येतील, ते सोडवायचे आणि जे प्रश्न सुटणार नाहीत, ते स्पष्टपणे जनतेला सांगायचे. पण राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर देखील अजित पवारांनी आपला जनता दरबार स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तसाच चालू ठेवला होता. आता रोहित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवारांच्या जनता दरबाराचा राजकीय वारसा पुढे चालवायचा निर्णय घेतलाय.

  •  अजितदादांचा खरा राजकीय वारसा सुनेत्रांकडेच

वास्तविक सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ताबडतोब बारामतीत अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीत पहिला जनता दरबार घेऊनही झाला होता. अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजकीय वारसा आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा वारसा आपोआपच सुनेत्रा पवारांकडे आला सुनेत्रा पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपच्या साहाय्याने अत्यंत चलाखीने अजित पवारांचा राजकीय वारसा आपल्याकडे टिकविण्यात यश मिळविले. अन्यथा अजितदादांचा राजकीय वारसा त्यांच्या पक्ष सकट गुंडाळण्याचा डाव बारामतीतल्या गोविंद बागेत खेळला गेला होता, पण तो डाव देवेंद्र फडणवीस सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी वेळीच ओळखून हाणून पाडला होता.



  • रोहित पवारांचे “डाव”

पण म्हणून शरद पवार गट गप्प बसला नाही. रोहित पवारांनी अजितदादांच्या विमान अपघाताचा विषय मुंबईपासून दिल्लीपर्यंत लावून धरत आपणच अजितदादांचे संघर्षाचे वारस आहोत, असे दाखविण्याचा डाव खेळला. अजितदादांच्या अपघातासाठी कारणीभूत असलेल्या लोकांना तुरुंगात पाठवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिज्ञा देखील रोहित पवारांनी करून झाली.

  • घातपात सिद्ध करायचा चंग

वास्तविक अजित पवारांच्या विमान अपघाताची राज्यात सीआयडीमार्फत चौकशी सुरू आहे आणि ही चौकशी केंद्रीय तपास संस्था सीबीआय मार्फत व्हावी अशी मागणी करणारे पत्र सुद्धा सुनेत्रा पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सीबीआय मार्फत चौकशी आणि तपासासाठी अनुकूलता दर्शवून तसे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठविले देखील आहे. त्यामुळे अजितदादांच्या विमान अपघाताविषयी सीबीआय चौकशी होणार यात कुठली शंका शिल्लक राहिलेली नाही, तरी देखील रोहित पवारांनी आपणच अजितदादांना न्याय देऊ शकतो असा आव आणत विमान अपघाताला घातपात ठरवण्याचा चंग बांधलाय.

  • रोहित पवारांची घुसखोरी, पण…

पण त्यापलीकडे जाऊन आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दर मंगळवारी जनता दरबार भरवायचे ठरवून रोहित पवार अजितदादांच्या राजकीय वारसा चालविण्यात परस्पर घुसखोरी करत आहेत. अजून शरद पवारांचा वारसा ठरत नाही. कारण सुप्रिया सुळे त्यांच्या रक्ताच्या वारस असल्या तरी राजकीय दृष्ट्या त्या शरद पवारांच्या इतक्या सक्षमतेने पुढे आलेल्या नाहीत. शरद पवारांनी सुद्धा त्यांना पुढे आणायचा डाव सोडून दिल्यासारखे वाटतेय. त्यामुळे रोहित पवार हेच शरद पवारांचे राजकीय वारस होऊ शकतात. तेच पवारांसारखे स्वतंत्र आणि आक्रमक राजकारण करू शकतात, अशा शक्यता पवारनिष्ठ माध्यमांनी अनेकदा बोलून दाखविल्या, पण शरद पवारांचे वारस ठरणे तर दूरच, रोहित पवारांनी अजितदादांच्या राजकीय वारसा मध्ये मधल्या मध्ये घुसखोरी करायचा डाव खेळलाय. त्यामधून त्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना आव्हान द्यायची खेळी केली आहे. पण ही खेळी यशस्वी होईल की नाही, याविषयी दाट शंका आहे. कारण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे राजकीय दृष्ट्या एकटे अलग – थलग पडलेले नाहीत. त्यांच्या मागे भाजप नावाची बलाढ्य राजकीय शक्ती उभी आहे.

Rohit Pawar infiltrating into Ajit Pawar’s political legacy

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment