Trending News

No trending news found.

Thursday, 18 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

राहुल गांधींच्या नेतृत्वात मणिशंकर अय्यर यांचा दुसरा खोडा; INDI आघाडीचे नेतृत्व दुसऱ्या नेत्याकडे सोपवायची केली मागणी

राहुल गांधींच्या नेतृत्वात मणिशंकर अय्यर यांनी आज दुसरा खोडा घातला. त्यांनी INDI आघाडीचे नेतृत्व राहुल गांधींच्या ऐवजी दुसऱ्या नेत्याकडे सोपवावे

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राहुल गांधींच्या नेतृत्वात मणिशंकर अय्यर यांनी आज दुसरा खोडा घातला. त्यांनी INDI आघाडीचे नेतृत्व राहुल गांधींच्या ऐवजी दुसऱ्या नेत्याकडे सोपवावे, अशी मागणी केली. याआधी मणिशंकर अय्यर यांनी राहुल गांधी हे काँग्रेसचे नेतृत्व करायचा क्षमतेचेच नेते नाहीत, असा दावा करून त्यांच्या नेतृत्वावर प्रहार केला होता. त्या पाठोपाठ त्यांनी राहुल गांधींकडून इंडिया गाडीचे नेतृत्व काढून घ्यावे आणि ते एक तर नेत्यांकडे सोपवावे अशी मागणी केली. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. Rahul Gandhi

– काँग्रेसमध्ये संताप

राहुल गांधींच्या नेतृत्व क्षमते विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करून मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसमध्ये अनेक नेते आहेत, की जे नेतृत्व करू शकतात, पण राहुल गांधींकडे ती क्षमता नाही. आपण नेहरूवादी इंदिरा गांधीवादी राजीव गांधीवादी आहोत. पण राहुल गांधीवादी नाही, असे वक्तव्य करून आधीच खळबळ उडवून दिली होती.



अय्यर यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी पसरली. काँग्रेसच्या सगळ्या प्रवक्त्यांनी अय्यर यांच्या वक्तव्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मणिशंकर अय्यर आता काँग्रेसमध्येच नाहीत. त्यामुळे आमच्या पक्षाच्या नेतृत्वाविषयी बोलायचा त्यांना अधिकारच नाही, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी केला होता. त्यावर पवन खेडा हा दोन टक्क्याचा ऑफिसर होता. तो काँग्रेसी नाही, असा टोला अय्यर यांनी हाणला होता.

– ममता, अखिलेश किंवा स्टालिन

पण आज मात्र त्या पलीकडे जाऊन मणिशंकर अय्यर यांनी राहुल गांधींकडे INDI आघाडीचे नेतृत्वच नको. त्यांच्या ऐवजी ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, एम. के. स्टालिन यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांकडे INDI आघाडीचे नेतृत्व द्यावे. त्यामुळे इंडिया गाडी जास्त सक्षम होईल. राहुल गांधींना सुद्धा इंडिया आघाडी सक्षम करण्यासाठी वेळ देता येईल, असा दावा केला. अय्यर यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये संताप पसरला.

Mani Shankar Aiyar’s second term under Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment