Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

दादांच्या सावलीवर सासऱ्यांचे सावट; नरेश अरोरा ते कसे करणार दूर ??

अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर सुनेत्रा पवारांचे नेतृत्व विकसित करण्यावर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस भर देत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामध्ये डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा आघाडीवर आहेत. त्यांनी म्हणे, "दादांची सावली" नावाची एक थीम तयार केली असून त्या थीम द्वारे अजित पवारांचे सावली म्हणून सुनेत्रा पवारांचे नेतृत्व विकसित करण्यात येईल.

नाशिक : अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर सुनेत्रा पवारांचे नेतृत्व विकसित करण्यावर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस भर देत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामध्ये डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा आघाडीवर आहेत. त्यांनी म्हणे, “दादांची सावली” नावाची एक थीम तयार केली असून त्या थीम द्वारे अजित पवारांचे सावली म्हणून सुनेत्रा पवारांचे नेतृत्व विकसित करण्यात येईल. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येतील. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असणाऱ्या मतदारसंघांमध्ये महिलांचे खास मेळावे भरवून त्यामध्ये सुनेत्रा पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व महिला केंद्रित योजनांवर भर देईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा महिलांमध्ये संघटनात्मक विस्तार करण्यात येईल. या सगळ्या प्रक्रियेत अजितदादांची सावली म्हणूनच सुनेत्रा पवार सर्वत्र वावरतील. या राजकीय खेळीतून सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची एक नवी ओळख तयार करण्याचा घाट नरेश अरोरा यांनी घालून करून तो प्रेझेंटेशन द्वारे सुनेत्रा पवार पार्थ आणि जय पवार यांच्यासमोर मांडला आहे. तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.Sharad Pawar will create more trouble in sunetra Pawar’s leadership development



– दादांच्या सावलीवर सासऱ्यांचे सावट

दादांची सावली आणि महिला केंद्रित नेतृत्व म्हणून ही थीम आकर्षक आहे, यात शंका नाही. दीर्घकालीन प्रयत्न आणि राजकारणातून ते साध्य करता येणे सुद्धा अशक्य नाही, पण अवघड निश्चित आहे. कारण ही दादांची सावली मूळातच स्वतंत्र सावली नसून ती सासऱ्याच्या सावटाखाली आधीच आलेली सावली आहे आणि या सावलीचे नेतृत्व विकसित करण्याचे खरे आव्हान नसून या सावलीला सासऱ्याच्या सावटाखालून बाहेर काढणे हे खरे आव्हान आहे. आणि तेच आव्हान नरेश अरोरा आणि त्यांच्या टीमला पेलायचे आहे.

– विलीनीकरणाचा डाव उधळावा लागेल

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचे काम सुरू करण्यापूर्वीच त्यांच्या सासऱ्यांच्या पक्षाने निर्माण केलेले विलीनीकरणाचे आव्हान आणि त्यातून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर निर्माण केलेला कब्जा करायचा “डाव” पहिला उधळावा लागेल. त्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोनच नेते पुरेसे ठरणार नाहीत. त्यासाठी सुनेत्रा पवार यांनाच कुटुंबाच्या पलीकडे जाऊन खरा राजकीय “डाव” खेळत असल्यास सिद्ध आणि साध्य करावे लागेल. कारण पवारांच्या राष्ट्रवादीच्या डबल गेमा किंवा ट्रिपल गेमा थांबण्याची सुतराम शक्यता नाही. आजच एकीकडे शशिकांत शिंदे यांनी आम्ही विलीनीकरणाचा विषय थांबविला असल्याचे सांगितले त्याच वेळी जयंत पाटलांनी विलीनीकरणाच्या विषयाला नवी उकळी दिली. काही मदत लागली, तर नि:ससंकोचपणे सांगा, असे जयंत पाटलांनी सुनेत्रा पवारांना सांगितले. पण यातूनच पवारांच्या राष्ट्रवादीचा “डबल गेम” करण्याचा डाव उघड्यावर आला.

– बंडखोर सून narrative

एकीकडे सुनेत्रा पवारांचे दादांची सावली म्हणून नेतृत्व विकसित करत असताना त्या नेतृत्वाच्या संघटनात्मक आणि अंगभूत मर्यादा असताना दुसरीकडे त्यांच्याच सासर्‍यांच्या पक्षातून मोठ्या अडथळा निर्माण केला जाईल. कारण दादांची सावली ही थीम वापरून ज्या राष्ट्रवादीच्या प्रभाव क्षेत्रात सुनेत्रा पवारांचे नेतृत्व विकसित करायचे आहेत, ते प्रभावक्षेत्र एकट्या दादांचे नाही, ते शरद पवारांचे सुद्धा आहे आणि म्हणूनच सुनेत्रा पवार दादांची सावली म्हणून जिथे जिथे जातील तिथे तिथे सासऱ्याचे सावट त्यांच्यावर कायम ठेवायचा “डाव” खेळला जाईल. नरेश अरोरा हे दादांची सावली म्हणून सुनेत्रा पवारांचे नेतृत्व विकसित करत असताना राष्ट्रवादीच्या प्रभावक्षेत्रात वेगवेगळे अडथळे निर्माण करायचे “कौशल्य” शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादीचे नेते वापरत राहतील. मध्ये मध्ये काड्या घालत राहतील. त्यात पवार कुटुंबीयांच्या ऐक्याचा ढोल पिटला जाईल. नरेश अरोरा एकीकडे सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व “दादांची सावली” म्हणून विकसित करत राहतील, तर त्याचवेळी पवारांच्या गोटातून त्यांना “बंडखोर सून” ठरविले जाईल. पवारांच्या कुटुंबात फूट पाडणारी सून म्हणून narrative तयार केले जाईल. या अर्थाने सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व “दादांची सावली” असले, तरी त्या सावलीवर सासऱ्यांचे सावट असेल आणि या सावटाचा अडथळा दूर करणे हे नरेश अरोरा आणि त्यांच्या टीम समोरचे खरे आव्हान असेल.

Sharad Pawar will create more trouble in sunetra Pawar’s leadership development

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment