Trending News

No trending news found.

Monday, 12 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Mahayuti BMC : महापालिकेसाठी महायुतीचा वचननामा- मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार:बेस्ट बसच्या तिकीटात महिलांना 50 टक्के सूट

मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी तसेच येथील गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर तयार करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच लाडक्या बहिणींना बेस्ट बसच्या तिकीटात 50 टक्के सूट देण्याचे आश्वासन महायुतीच्या वचननाम्यातून देण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Mahayuti BMC मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी तसेच येथील गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर तयार करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच लाडक्या बहिणींना बेस्ट बसच्या तिकीटात 50 टक्के सूट देण्याचे आश्वासन महायुतीच्या वचननाम्यातून देण्यात आले आहे.Mahayuti BMC

पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईत असलेल्या मराठी माणसाच्या हिताचे आणि मराठी भाषेचे रक्षण करणे आणि वाढवणे ही आमची जबाबदारी आहे आणि आमचे वचन देखील आहे. तसेच मुंबईच्या बाहेर गेलेला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर गेला, याला जबाबदार कोण? मुंबईत मराठी माणसाला परत आणण्याची देखील आमची जबाबदारी आहे.Mahayuti BMC

मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. 20 हजार इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आम्ही घेतला असून याची अंमलबजावणी पुढील एक वर्षात केली जाईल. झोपडपट्टी मुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न होते. 40 लाख लोकांना घर देणे. परंतु, मागच्या अनेक वर्षात काहीच झाले नाही. वारसा सांगणाऱ्यांची ती जबाबदारी होती. परंतु आता आम्ही ते पूर्ण करणार आहोत. सुनियोजित मुंबईचा विकास करण्याचे आमची जबाबदारी असून ती आम्ही या वचननाम्यातून करणार आहोत. गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्याचे आम्ही काम सुरू केले आहे. आतापर्यंत 12 हजार लोकांना घरे दिली आहेत. देशाच्या पंतप्रधानानांनी देखील घोषणा केली आहे की सर्वांसाठी घरे यानुसार आम्ही काम करत आहोत. मुंबईतला माणूस हा बाहेर जाऊ नये आणि बाहेर गेलेला पुन्हा यावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

बेस्ट बसच्या तिकीटात लाडक्या बहिणींना 50 टक्के सवलत

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, अशी टीका विरोधक आमच्यावर करत असतात. पण पंतप्रधान मोदींनी मुंबईला फार महत्त्व दिले आहे. मुंबईला फीनटेक सीटी करण्याचा निर्धार आमचा आहे. बीकेसीला इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर, स्टार्टअप हब उभारले जाणार आहेत. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे जन्मशताब्दी वर्ष असून महापालिकेच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबवणार आहोत. हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ महापालिकेच्या रुग्णालयांना संलग्न करण्याचा आमचा मानस आहे. बेस्ट बसच्या तिकीटात लाडक्या बहिणींना 50 टक्के सवलत, लघु उद्योजकांना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, कोळीवाडा आणि गावठाण यांचे स्वतंत्र डीसीआर तयार करून पुनर्विकास, पुनर्विकास प्रकल्प राबवताना जी काही अडथळे येत होती, सगळे अडथळे आम्ही दूर केले आहेत. पाणीपट्टीत दरवर्षी 8 टक्के वाढ होते, पण ही वाढ पुढील 5 वर्षांसाठी स्थगित केली आहे. प्रदूषणमुक्त मुंबई करण्यासाठी 17 हजार कोटी रुपये खर्च करून पर्यावरण संवर्धन करणे, प्रदूषित पाणी समुद्रात सोडणे बंद केले जाणार. मुंबई खड्डेमुक्त करणार, असे आश्वासन शिंदेंनी दिले आहे.

मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबई सोडून जावे लागणार नाही- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुतीचा वचननामा आज प्रकाशित केला आणि उपमुख्यमंत्र्यांनी या वचननाम्याचे हायलाइट आपल्या समोर ठेवले आहे. आम्ही मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना केवळ हातच घातला नाही तर ते प्रश्न सुटू शकतात, असा विश्वास आम्ही निर्माण केला आहे. आम्ही जो काही वचननामा देत आहोत, ते पूर्ण करणार आहोत. या वचननाम्यावर आधारित अॅक्शन टेकन रिपोर्ट आम्ही फॅक्ट शीट म्हणून लोकांसमोर मांडू. गृहनिर्मणाचा जो प्रश्न आहे मुंबईकरांचा, यातील विविध निर्णय आम्ही घेतले आहेत. एक संकल्प आम्ही आज घेतला आहे, मुंबईत राहणारा जो मराठी माणूस आहे, याला काहीही झाले तरी मुंबई सोडून जावे लागणार नाही. त्याला मुंबईतच घर देणार आणि हे आम्ही करून दाखवत आहोत.

धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक पात्र व्यक्तीला धारावीतच घर देणार

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जमिनीचा एक इंचही आम्ही विकणार नाहीत. तसेच वेगवेगळ्या एसआरएच्या योजना मार्गी लावण्याचे काम सुरू केले आहे. तसेच मी पुन्हा एकदा सांगतो धारावीचा विकास हा डीआरपी करणार आहे. यात स्वतः शासन भागीदार आहे. धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो पात्र आहे, त्याला धारावीमध्येच किमान 350 स्क्वेर फूटाचे घर देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. धारावीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे लघू व्यवसाय चालतात, त्यांना त्याच ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने एकोसिस्टम तयार करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या शाळा आधुनिक करणार

महानगरपालिकेत काम करणारे जेवढे सफाई कामगार आहेत, त्यांना मुंबईत मालकी हक्काचे घर देणार आहोत. शिक्षणाच्या क्षेत्रात देखील महापालिकेच्या माध्यमातून शाळा आधुनिक करणे, कौशल्ययुक्त करणे आणि हे करत असताना महापालिकेच्या प्रत्येक शाळेत आमच्या मुलांना मराठी नीट शिकता आली पाहिजे त्यासाठी मराठी लॅब तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शिक्षणात ज्या काही आता नवीन शैक्षणीत सुविधा आल्या आहेत, त्या सगळ्या आम्ही वापरणार आहोत. आरोग्याच्या क्षेत्रात चांगल्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. 2 हजार नवीन बेड तयार करण्याचे काम करणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कचऱ्यापासून वीज निर्मिती करणार

मिठी नदीला निर्मळ करणार आहोत, यासाठी 5-6 वर्ष लागतील. यासोबत जेवढे मुंबईचे डंपिंग ग्राउंड आहेत त्यांना कॅपिंग करणे आणि डंपिंग बंद करणे, या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. कचऱ्यापासून वीज निर्मिती करणार आहोत, गॅस निर्मिती देखील करता येऊ शकेल. यासाठी 17 हजार कोटींचा क्लायमेट अॅक्शन प्लॅन हाती घेतला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबईतल्या लोकल बंद दरवाजाच्या आणि एसीयुक्त करणार

मुंबईतील लोकल ट्रेनसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बंद दरवाजाचे डबे आणि पूर्णपणे एसी डबे तयार करणार आहोत. लोकलमध्ये अतिशय चांगला प्रवास येणाऱ्या काळात करता येणार आहे. तसेच मुंबई लोकलला आणखी 3 डबे वाढवण्यासाठी चाचणी सुरू आहे. तसेच वॉटर टॅक्सी देखील सुरू करत आहोत. नवी मुंबईच्या विमानतळापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सीने येता येईल, अशी सुविधा आम्ही करणार आहोत.

मुंबईसाठी महायुतीच्या वचननाम्यातील मुद्दे

– मुंबईला पाणीपुरवठा पुढील 5 वर्षात गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार
– पर्यावरण संवर्धन योजनेमार्फत 17 हजार कोटी रुपये
– बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार
– सर्व भाजी मंडईचे नुतनीकरण आणि पुर्नविकास करणार
– फिश इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सेंटर स्थापन करण्यात येणार
– लघु उद्योग धोरण राबवले जाणार
– पुर्नविकासाला जलदगती देणार, पागडीमुक्त मुंबई आणि फनेल झोनप्रश्नी योजना राबवणार
– बेस्टमध्ये 2029 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस
– बेस्टमध्ये महिलांना 50 टक्के सवलत
– बेस्ट बसेसची संख्या 5 हजारवरुन 10 हजारांवर जाणार
– स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरची उभारणी करणार
– लाडक्या बहिणींना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
– रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबई करणार
– पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार
– मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करणार
– बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्ताने मराठी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम
– पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाची स्थापना करणार
– हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारणार
– रविंद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर अन्य नाट्यगृहांचा पुर्नविकास करणार
– विकसित मुंबईसाठी 2034 चा आराखडा तयार होणार

मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी तसेच येथील गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर तयार करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच लाडक्या बहिणींना बेस्ट बसच्या तिकीटात 50 टक्के सूट देण्याचे आश्वासन महायुतीच्या वचननाम्यातून देण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईत असलेल्या मराठी माणसाच्या हिताचे आणि मराठी भाषेचे रक्षण करणे आणि वाढवणे ही आमची जबाबदारी आहे आणि आमचे वचन देखील आहे. तसेच मुंबईच्या बाहेर गेलेला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर गेला, याला जबाबदार कोण? मुंबईत मराठी माणसाला परत आणण्याची देखील आमची जबाबदारी आहे.

मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. 20 हजार इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आम्ही घेतला असून याची अंमलबजावणी पुढील एक वर्षात केली जाईल. झोपडपट्टी मुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न होते. 40 लाख लोकांना घर देणे. परंतु, मागच्या अनेक वर्षात काहीच झाले नाही. वारसा सांगणाऱ्यांची ती जबाबदारी होती. परंतु आता आम्ही ते पूर्ण करणार आहोत. सुनियोजित मुंबईचा विकास करण्याचे आमची जबाबदारी असून ती आम्ही या वचननाम्यातून करणार आहोत. गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्याचे आम्ही काम सुरू केले आहे. आतापर्यंत 12 हजार लोकांना घरे दिली आहेत. देशाच्या पंतप्रधानानांनी देखील घोषणा केली आहे की सर्वांसाठी घरे यानुसार आम्ही काम करत आहोत. मुंबईतला माणूस हा बाहेर जाऊ नये आणि बाहेर गेलेला पुन्हा यावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

बेस्ट बसच्या तिकीटात लाडक्या बहिणींना 50 टक्के सवलत

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, अशी टीका विरोधक आमच्यावर करत असतात. पण पंतप्रधान मोदींनी मुंबईला फार महत्त्व दिले आहे. मुंबईला फीनटेक सीटी करण्याचा निर्धार आमचा आहे. बीकेसीला इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर, स्टार्टअप हब उभारले जाणार आहेत. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे जन्मशताब्दी वर्ष असून महापालिकेच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबवणार आहोत. हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ महापालिकेच्या रुग्णालयांना संलग्न करण्याचा आमचा मानस आहे. बेस्ट बसच्या तिकीटात लाडक्या बहिणींना 50 टक्के सवलत, लघु उद्योजकांना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, कोळीवाडा आणि गावठाण यांचे स्वतंत्र डीसीआर तयार करून पुनर्विकास, पुनर्विकास प्रकल्प राबवताना जी काही अडथळे येत होती, सगळे अडथळे आम्ही दूर केले आहेत. पाणीपट्टीत दरवर्षी 8 टक्के वाढ होते, पण ही वाढ पुढील 5 वर्षांसाठी स्थगित केली आहे. प्रदूषणमुक्त मुंबई करण्यासाठी 17 हजार कोटी रुपये खर्च करून पर्यावरण संवर्धन करणे, प्रदूषित पाणी समुद्रात सोडणे बंद केले जाणार. मुंबई खड्डेमुक्त करणार, असे आश्वासन शिंदेंनी दिले आहे.

मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबई सोडून जावे लागणार नाही- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुतीचा वचननामा आज प्रकाशित केला आणि उपमुख्यमंत्र्यांनी या वचननाम्याचे हायलाइट आपल्या समोर ठेवले आहे. आम्ही मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना केवळ हातच घातला नाही तर ते प्रश्न सुटू शकतात, असा विश्वास आम्ही निर्माण केला आहे. आम्ही जो काही वचननामा देत आहोत, ते पूर्ण करणार आहोत. या वचननाम्यावर आधारित अॅक्शन टेकन रिपोर्ट आम्ही फॅक्ट शीट म्हणून लोकांसमोर मांडू. गृहनिर्मणाचा जो प्रश्न आहे मुंबईकरांचा, यातील विविध निर्णय आम्ही घेतले आहेत. एक संकल्प आम्ही आज घेतला आहे, मुंबईत राहणारा जो मराठी माणूस आहे, याला काहीही झाले तरी मुंबई सोडून जावे लागणार नाही. त्याला मुंबईतच घर देणार आणि हे आम्ही करून दाखवत आहोत.

धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक पात्र व्यक्तीला धारावीतच घर देणार

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जमिनीचा एक इंचही आम्ही विकणार नाहीत. तसेच वेगवेगळ्या एसआरएच्या योजना मार्गी लावण्याचे काम सुरू केले आहे. तसेच मी पुन्हा एकदा सांगतो धारावीचा विकास हा डीआरपी करणार आहे. यात स्वतः शासन भागीदार आहे. धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो पात्र आहे, त्याला धारावीमध्येच किमान 350 स्क्वेर फूटाचे घर देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. धारावीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे लघू व्यवसाय चालतात, त्यांना त्याच ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने एकोसिस्टम तयार करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या शाळा आधुनिक करणार

महानगरपालिकेत काम करणारे जेवढे सफाई कामगार आहेत, त्यांना मुंबईत मालकी हक्काचे घर देणार आहोत. शिक्षणाच्या क्षेत्रात देखील महापालिकेच्या माध्यमातून शाळा आधुनिक करणे, कौशल्ययुक्त करणे आणि हे करत असताना महापालिकेच्या प्रत्येक शाळेत आमच्या मुलांना मराठी नीट शिकता आली पाहिजे त्यासाठी मराठी लॅब तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शिक्षणात ज्या काही आता नवीन शैक्षणीत सुविधा आल्या आहेत, त्या सगळ्या आम्ही वापरणार आहोत. आरोग्याच्या क्षेत्रात चांगल्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. 2 हजार नवीन बेड तयार करण्याचे काम करणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कचऱ्यापासून वीज निर्मिती करणार

मिठी नदीला निर्मळ करणार आहोत, यासाठी 5-6 वर्ष लागतील. यासोबत जेवढे मुंबईचे डंपिंग ग्राउंड आहेत त्यांना कॅपिंग करणे आणि डंपिंग बंद करणे, या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. कचऱ्यापासून वीज निर्मिती करणार आहोत, गॅस निर्मिती देखील करता येऊ शकेल. यासाठी 17 हजार कोटींचा क्लायमेट अॅक्शन प्लॅन हाती घेतला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबईतल्या लोकल बंद दरवाजाच्या आणि एसीयुक्त करणार

मुंबईतील लोकल ट्रेनसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बंद दरवाजाचे डबे आणि पूर्णपणे एसी डबे तयार करणार आहोत. लोकलमध्ये अतिशय चांगला प्रवास येणाऱ्या काळात करता येणार आहे. तसेच मुंबई लोकलला आणखी 3 डबे वाढवण्यासाठी चाचणी सुरू आहे. तसेच वॉटर टॅक्सी देखील सुरू करत आहोत. नवी मुंबईच्या विमानतळापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सीने येता येईल, अशी सुविधा आम्ही करणार आहोत.

मुंबईसाठी महायुतीच्या वचननाम्यातील मुद्दे

– मुंबईला पाणीपुरवठा पुढील 5 वर्षात गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार
– पर्यावरण संवर्धन योजनेमार्फत 17 हजार कोटी रुपये
– बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार
– सर्व भाजी मंडईचे नुतनीकरण आणि पुर्नविकास करणार
– फिश इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सेंटर स्थापन करण्यात येणार
– लघु उद्योग धोरण राबवले जाणार
– पुर्नविकासाला जलदगती देणार, पागडीमुक्त मुंबई आणि फनेल झोनप्रश्नी योजना राबवणार
– बेस्टमध्ये 2029 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस
– बेस्टमध्ये महिलांना 50 टक्के सवलत
– बेस्ट बसेसची संख्या 5 हजारवरुन 10 हजारांवर जाणार
– स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरची उभारणी करणार
– लाडक्या बहिणींना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
– रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबई करणार
– पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार
– मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करणार
– बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्ताने मराठी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम
– पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाची स्थापना करणार
– हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारणार
– रविंद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर अन्य नाट्यगृहांचा पुर्नविकास करणार
– विकसित मुंबईसाठी 2034 चा आराखडा तयार होणार

Mahayuti BMC Manifesto 2026: Slum-Free Mumbai & 50% BEST Fare Cut for Women PHOTOS VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment