Trending News

No trending news found.

Saturday, 10 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

रवींद्र चव्हाणांची खेळी पडली तोकडी; अंबरनाथ मध्ये शिंदे सेनेनेच मारली बहुमताची बाजी!!

अंबरनाथच्या नगर परिषदेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फार मोठी खेळी केली खरी, पण ती सुद्धा तोकडी ठरली. अंबरनाथ नगर परिषदेत बहुमताची बाजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेच मारली.

नाशिक : अंबरनाथच्या नगर परिषदेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फार मोठी खेळी केली खरी, पण ती सुद्धा तोकडी ठरली. अंबरनाथ नगर परिषदेत बहुमताची बाजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेच मारली.

अंबरनाथ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजपने प्रसंगी काँग्रेसशी सुद्धा आघाडी केली. पाडली. कुठलीही सत्ता मिळवण्यासाठी भाजप काँग्रेस बरोबर सुद्धा जाऊ शकतो, असे चित्र निर्माण झाले. यातून महाराष्ट्रात भाजपची प्रतिमा हानी झाली. स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी घडवून आणलेले हे अभद्र समीकरण दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले. दिल्लीतल्या भाजपच्या नेत्यांनी त्या अभद्र आघाडीची दखल घेतली. त्यांनी भाजपच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना केंद्रातून दट्ट्या हाणला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबरनाथची भाजप – काँग्रेस आघाडी हाणून पाडली. पण ही आघाडी हाणून पडताच रवींद्र चव्हाण यांनी वेगळीच खेळी केली. त्यांनी काँग्रेसचे सगळेच म्हणजे 12 नगरसेवक भाजपमध्ये आणले. त्यामुळे रवींद्र चव्हाण फार मोठे “खिलाडी” ठरले, असे सुरुवातीला अनेकांना वाटले.



– चव्हाणांची खेळी पडली तोकडी

पण प्रत्यक्षात रवींद्र चव्हाण यांची राजकीय खेळी अपुरी पडली. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीला भाजपपासून फोडले आणि त्यांचे चार नगरसेवक शिवसेनेबरोबर जोडून घेतले. त्यामुळे अंबरनाथ नगरपरिषदेतले बहुमताचे चित्र पालटले.

– श्रीकांत शिंदेच ठरले भारी

अंबरनाथ नगर परिषदेत नगराध्यक्ष भाजपचा निवडून आला. पण बहुमत शिंदे सेनेच्या बरोबर राष्ट्रवादीचे झाले. शिंदे सेनेचे 27 राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि अपक्ष एक या सगळ्यांनी एक गट स्थापन करून नगरसेवकांची संख्या 32 वर पोहोचवली.

त्या उलट भाजपचे 16 आणि काँग्रेसचे फुटलेले 10 असे 26 च नगरसेवक होऊ शकले. त्यामुळे बहुमत शिंदे सेनेचे झाले. अंबरनाथ मधली शिवसेनेची सत्ता उखडून टाकण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी जंग जंग पछाडले, पण शिंदे सेनाच त्यांच्यावर भारी ठरली.

In Ambernath, the Shinde sena faction won the majority.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment