Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
Uncategorized

Chagan Bhujbal : महायुतीमधील नेत्यांनाच भुजबळ जड झालेत ?

अनेक महिने होऊन गेले तरी नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अजूनही सुटत नाहीये. मात्र नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुती मधील नेत्यांमध्येच रस्सीखेच चालू असल्याचं दिसून येतंय. पालक मंत्री पदासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील पालकमंत्री पदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. परंतु शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांना विरोध केला आहे. 

विशेष प्रतिनिधि 

पुणे : अनेक महिने होऊन गेले तरी नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अजूनही सुटत नाहीये. मात्र नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुती मधील नेत्यांमध्येच रस्सीखेच चालू असल्याचं दिसून येतंय. पालक मंत्री पदासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील पालकमंत्री पदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. परंतु शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांना विरोध केला आहे. Chagan Bhujbal



राष्ट्रवादीचे नाशिक मध्ये सात आमदार असल्याने नाशिकचा पालकमंत्री हा राष्ट्रवादीचा असला पाहिजे असं भुजबळांचं म्हणणं आहे. यावर नाशिक मध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार असले तरी ते भुजबळांसोबत नसल्याचं कांदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांच्या नावाला माझा विरोध आहे, असं कांदे यांनी म्हटलं आहे. पालकमंत्री पदाचा वाद पेटल्यापासून छगन भुजबळ यांच्या नावाला उघडपणे विरोध करणारे सुहास कांदे हे पहिलेच नेते आहेत.

कांदे म्हणाले, ‘मी भुजबळ यांना एकच विनंती करेन की राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत पण ते तुमच्या सोबत आहेत का? हे एकदा तपासून पहा. पालकमंत्री कोण होणार हे जरी मुख्यमंत्री ठरवणार असले तरीही माझा स्वतःचा भुजबळ साहेबांना व्यक्तिगत विरोध असेल. केवळ माझाच नाही तर राष्ट्रवादी व भाजपच्याही आमदारांचा भुजबळांच्या नावाला विरोध’ असल्याचा दावा कांदे यांनी केला आहे. ‘भुजबळांसोबत आज एकही आमदार नाही ते एकटे आहेत’ असेही कांदे यांनी म्हटल आहे. Chagan Bhujbal

या सगळ्या प्रकाराबाबत मंत्री छगन भुजबळ यांनाही माध्यमांकडून विचारणा झाली. मात्र छगन भुजबळ यांनी यावर काहीही बोलणे टाळले आहे. ‘यावर मला काहीही बोलायचं नाही’ असं भुजबळ यांनी म्हटलं.

दरम्यान शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी मात्र सुहास कांदे यांच्या या वक्तव्याला विरोध केला आहे. ते म्हणाले ‘पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील. पालकमंत्री पदासाठी वरिष्ठ आहेत. त्यांचा जो काही सामूहिक निर्णय असेल तो सर्वांना मान्य राहील, त्यामुळे आता यावर वाद घालण्यात काही अर्थ नाही.’ Chagan Bhujbal

जवळपास दहा महिने उलटून गेल्यानंतरही पालकमंत्री निश्चित न झाल्यामुळे नाशिकचा पालकमंत्री नेमका कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Is Chagan Bhujbal a problem for the leaders of the Mahayuti?

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment