Trending News

No trending news found.

Sunday, 17 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Man Arrested : भाजपाच्या नेत्याच्या पत्नी आणि मुलीबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह अश्लील पोस्ट करणारा जेरबंद

भाजपाच्या एका नेत्याच्या पत्नी आणि मुलीबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अश्लील पोस्ट पसरवल्याच्या आरोपाखाली मुंबई सायबर पोलिसांनी किरण सीताराम जाधव याला अटक केली आहे. अटकेनंतर आरोपीला फोर्ट कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती वकील अजय दुबे यांनी दिली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Man Arrested भाजपाच्या एका नेत्याच्या पत्नी आणि मुलीबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अश्लील पोस्ट पसरवल्याच्या आरोपाखाली मुंबई सायबर पोलिसांनी किरण सीताराम जाधव याला अटक केली आहे. अटकेनंतर आरोपीला फोर्ट कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती वकील अजय दुबे यांनी दिली.Man Arrested

आरोपीने “मुख्य नास्तिक किरण जाधव” या फेसबुक प्रोफाइलवरून वादग्रस्त मजकूर पोस्ट केला होता.Man Arrested

27 नोव्हेंबर रोजी दक्षिण मुंबईतील पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षाची एक महिला कार्यकर्ता सोशल मीडियावर ब्राउझिंग करत होती. त्यावेळी तिला एका फेसबुक प्रोफाइलवरून आपल्या पक्षातील एका बड्या नेत्याच्या पत्नी आणि मुलीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट झाल्याचे लक्षात आले. आरोपीने भाजपाच्या बड्या नेत्याचा, त्याच्या पत्नीचा आणि त्या दोघांच्या मुलीचा फोटो शेअर केला होता. फोटोच्या मध्यभागी मराठीत एक अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील संदेश लिहिला होता. महिला कार्यकर्त्याने तत्काळ ही बाब दक्षिण सायबर पोलीस ठाण्याला कळवली.Man Arrested



पोलिसांनी आरोपीच्या मोटारसायकलचा नोंदणी क्रमांक मिळवला, ज्यामध्ये मोटारसायकल छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी किरण सीताराम जाधव याच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत आरोपी किरण जाधव याला अटक केली. अटकेनंतर चौकशीत किरण जाधव याने कबूल केले की, वादग्रस्त पोस्टसाठी वापरलेले सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्यात मोबाइल क्रमाकाशी लिंक आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीचा मोबाइल फोन देखील जप्त केला आहे. दरम्यान, आता आरोपीने आक्षेपार्ह पोस्ट दुसऱ्याच्या सांगण्यावरून पोस्ट केली का? त्याचे इतर साथीदार कोण आहेत? आणि आरोपीच्या साथीदारांनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा इतर मोबाइल फोनवरून अशाच आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्या आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.

Man Arrested for Posting Obscene, Derogatory Content About BJP Leader’s Wife and Daughter

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment