Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
Uncategorized

Sanjay Kumar : संजय कुमार यांच्या माफीने राहुल गांधींचं पितळ उघडं पडलं !

लोकनीती-सीएसडीएसशी संबंधित निवडणूक अभ्यासक संजय कुमार यांनी मंगळवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या पोस्ट बद्दल माफी मागितली आहे. संबंधित पोस्ट मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचा दावा करण्यात आला होता.

विशेष प्रतिनिधि 

मुंबई : लोकनीती-सीएसडीएसशी संबंधित निवडणूक अभ्यासक संजय कुमार यांनी मंगळवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या पोस्ट बद्दल माफी मागितली आहे. संबंधित पोस्ट मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचा दावा करण्यात आला होता. Sanjay Kumar



संजय कुमार हे लोकनीती-सीएसडीएसचे सहसंचालक देखील आहेत. त्यांनी मंगळवारी (ता.१९) ‘एक्स’ या त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून संबंधित पोस्ट टाकल्या बद्दल माफी मागितली आहे. ‘महाराष्ट्र निवडणुकीसंदर्भात पोस्ट केलेल्या ट्विटबद्दल मी मनापासून माफी मागतो. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा डेटा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा डेटा यांची तुलना करतांना त्रुटी आली. आमच्या डेटा टीमने या संदर्भातला डेटा चुकीचा वाचला. त्यानंतर ट्विट काढून टाकण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती पसरवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता,’ असे लिहित लोकनीती-सीएसडीएसचे सहसंचालक संजयकुमार यांनी माफी मागितली.

संजय कुमार यांनी माफी मागितल्यामुळे सत्ताधारी भाजपाकडून आता जोरदार टीका केली जात आहे. भाजपा आयटी प्रमुख अमित मालवीय यांनीही संजय कुमार चांगलेच सुनावले आहे. ‘माफी आली आहे मात्र संजय कुमार बाहेरच आहे. खरं तर, योगेंद्र यादव यांचे हे शिष्य शेवटचे कधी बरोबर ठरले आहेत? प्रत्येक निवडणुकीच्या आधी त्यांच्या अंदाजांनुसार भाजप हरत असतो—आणि उलटं घडलं की, टीव्हीवर येऊन भाजप कसा जिंकला हे समजावण्याचा त्यांचा कार्यक्रम असतो. किती सोयीस्कर! त्यांना बहुतेक वाटतं की टीव्ही प्रेक्षक मुर्ख आहेत,’ या भाषेत मालवीय यांनी संजय कुमार यांच्यावर टीका केली आहे. Sanjay Kumar

‘काँग्रेसने महाराष्ट्रात रचलेल्या बनावट कथेला पोषण देण्यासाठीच्या उत्साहात, CSDS ने पडताळणी न करता आकडेवारी प्रसिद्ध केली. हे विश्लेषण नाही ही तर ठरवून केलेली पक्षपाती भूमिका आहे,’ असा गंभीर आरोपही मालवीय यांनी संजय कुमार यांच्यावर केला आहे.

‘म्हणूनच आता संजय कुमार आणि योगेंद्र यादव यांच्यासारख्या लोकांचे तथाकथित प्रामाणिक भाषणं   आपण शंका घेऊनच ऐकावे,’ असं आवाहन मालवीय यांनी सामान्य नागरिकांना केलं आहे. Sanjay Kumar

राहुल गांधी याच डेटावरून वोट चोरीचे आरोप करत होते?

संजय कुमार यांच्यावर आणखी टीका करत मालवीय यांनी पुढे लिहिलं की, ‘महाराष्ट्रातील मतदारांना बदनाम करण्यासाठी राहुल गांधी ज्या संस्थेच्या डेटावर अवलंबून होते, त्याच संस्थेने आता त्यांचे आकडे चुकीचे असल्याचे कबूल केले आहे. यात केवळ महाराष्ट्राचेच नाही तर एसआयआरचेही आकडे आहेत.’ Sanjay Kumar

संजय कुमार यांनी माफी मागितल्यामुळे आता राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप तरी कितपत खरे आहेत? की राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप हे देखील केवळ डेटा वाचण्यात झालेली चूक आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Sanjay Kumar’s apology exposed Rahul Gandhi’s brass!

महत्वाच्या बातम्या

 

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment